Premandan Naik Hunger Strike Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: भूतानी प्रकल्पाचा परवाना रद्द करा, सांकवाळवासीय मागणीवर ठाम; प्रेमानंद नाईकांचे उपोषण सुरुच

Premandan Naik Hunger Strike: ‘भूतानी इन्फ्रा’ प्रकल्पाला पंचायतीने दिलेला परवाना मागे घ्यावा यासाठी सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे गेले तीन दिवस सांकवाळ पंचायती समोर उपोषणास बसले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: सांकवाळ, सावळफोंड येथे होणाऱ्या ‘भूतानी इन्फ्रा’ प्रकल्पाला पंचायतीने दिलेला परवाना मागे घ्यावा यासाठी सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे गेले तीन दिवस सांकवाळ पंचायती समोर उपोषणास बसले आहेत.

बुधवारी खासदार विरियातो फर्नांडिस व आमदार आंतोन वाझ यांनी नाईक यांची भेट घेउन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली.

आमदार आंतोन वाझ यांनी या प्रकल्पाला देण्यात आलेला परवाना मागे घेण्यासाठी आपले सरकारी दरबारी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला नको असलेल्या प्रकल्पांना सरकार थारा देणार नाही, त्यामुळे प्रेमानंद नाईक यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. तसेच कुठ्ठाळीत जनतेची परवानगी असलेले प्रकल्प उभारण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

प्रकृती खालावली

प्रेमानंद नाईक हे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर नजर ठेवून आहेत. दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी नाईक यांच्या तब्येती विषयी माहिती जाणून घेतली आहे.

...तोवर उपोषण सुरूच राहणार

भूतानी प्रकल्प साकवाळातून हद्दपार होत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. पाठिंबा देण्यासाठी आलेल्यांचा आपण ऋणी आहे. आमदार वाझ यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सरकारी दरबारी आमच्या गावाच्या भल्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रेमानंद नाईक यांनी यावेळी सांगितले.

उपोषणस्थळी वातावरण तंग

प्रकल्पाविरोधात आमरण उपोषणावर बसलेले सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे तिसऱ्या दिवशीही आपल्या भूमिकेवर ठाम होते. नाईक यांची भेट घेण्यासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना पंचायत सचिव ओरविल वालीस यांनी ढकलल्यामुळे येथील वातावरण काही वेळ तापले होते. याप्रकरणी काणकोणकर यांनी वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अनेकांचा पाठिंबा

दरम्यान, आम आदमीचे आमदार क्रूझ सिल्वा, आमदार वेन्जी व्हिएगास, वाल्मिकी नायक यांनी प्रेमानंद नाईक यांना समर्थन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. बुधवारी उपोषणाला बसलेले प्रेमानंद नाईक यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरने त्यांची तपासणी केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT