Electricity Junction Poles  Canava
गोवा

Goa Electricity Department: वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे बोरी-शिरोड्यात नागरिक त्रस्त

Goa Rain: पावसामुळे वीजपुरवठा बंद झाल्यावर उद्योग-व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने नागरिकांना सोसावे लागते आर्थिक नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाचा जोर वादळी वारे आणि वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे बोरी, शिरोडा, बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार भागातील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात पुन्हा पुन्हा वीज खंडित होण्याचे प्रकार खूपच वाढलेले आहेत.

एकदा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यास बराच वेळ लागत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागते. दिवसाही पुन्हा पुन्हा वीजपुरवठा बंद झाल्यावर नागरिकांना विजेवर चालणारे उद्योग-व्यवसाय सक्तीने बंद ठेवावे लागत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते.

विजेअभावी पंखे चालत नाहीत. एसी लागत नसल्याने लोकांना झोप लागत नाही, अशा तक्रारी आहेत. शिवाय दूरदर्शनवरचे कार्यक्रमही बघता येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची मागणी लोक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

SCROLL FOR NEXT