म्हापसा, पणजी: ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) राज्यातील वीजपुरवठा खंडित (Electricity Cut off) होऊन चार दिवस उलटले, तरी अजूनही अनेक भाग कोळखात आहे. चौथ्या दिवशीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने पाणी असूनही ते पंपामुळे टाक्यांमध्ये चढविणे शक्य झाले नाही. टँकरनेही (Tanker) मोफत पाणीपुरवठा (Water Supply) केला जात नाही. कोरोनाचे संकट असताना वीज व पाण्यासाठी लोकांवर अत्यंत दयनीय स्थिती ओढवली आहे. आणखी किती दिवस वीज व पाण्याविना राहावे लागणार आहे असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. या संतापाचा उद्रेक आज म्हापशात (Mapusa) होऊन सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी म्हापसावासीयांनी वीज खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला व तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. (Citizens of Goa are suffering due to lack of electricity and water.)
दरम्यान, जुनसवाडा-मांद्रे येथील सुमारे 50 हून अधिक ग्रामस्थांनी मंगळवारी संध्याकाळी आगारवाडा वीज केंद्रावर धडक देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. चोपडे-केरी मार्गावरील मधलामाज येथील प्रसिद्ध श्री महालसा मंदिर परिसरातील दोन वीज खांब मोडले होते. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा मागील 64 तासांहून अधिक काळ खंडित होता. लोकांनी आक्रमक भूमिका घेत तेथील दोन्ही खांब उभारण्यास वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना भाग पाडले. राज्यातील अनेक भागातही लोकांनी वीज केंद्रावर जावून जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मात्र वीज खात्याचे कर्मचारी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करून ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेबरोबरच त्यांना इतरही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
गोव्यात इंटरनेटला पर्याय म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 'इंट्रानेट' दिल...
म्हापशातील खोर्ली भाग गेल्या 72 तासांपासून अंधारात असल्याने खोर्लीतील नागरिकांनी हा मोर्चा नेऊन वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचा आग्रह धरला. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. अखेर पोलिस संरक्षणात वीज खात्याच्या दोन लाईनमन घेऊन खोर्लीवासीय आपल्या भागात गेले.
आमदार आमचा फोन उचलत नाहीत...
म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसौझा आमचा फोन उचलत नाहीत. फक्त आपल्या मर्जीतील नागरिकांशी संवाद साधून फोटो काढून निघून जातात. मागच्या 72 तासांत त्याना म्हापसेकरांना अंधारातून बाहेर काढण्यात अपयश आल्याबद्दल खोर्लीवासीयांनी यावेळी कडक शब्दात आमदाराबद्दल नाराजी व्यक्त केली. आमदारांनी म्हापसेकरांना अंधारात ठेवून स्वतःचे निवासस्थान उजेडात ठेवले आहे. रात्रीच्यावेळी वातानुकुलीत खोलीत झोपणाऱ्या आमदारांना आमच्यासारख्या सामान्य जननेतची समस्या कशी कळणार असा आरोपही यावेळी काहींनी केला.
GOA: समुद्राचे पाणी विहीरीत गेल्याने गोंयकारांचे पिण्याच्या पाण्याचे हाल
गेल्या चार दिवसांपासून राज्यात झालेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे घरातील फ्रीज तसेच पंखे बंद असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची पाळी आली आहे. पाणी नसल्याने जगायचे कसे असा संतापजनक प्रश्न सर्वसामान्यांकडून केला जात आहे. राजधानी पणजीपासून जवळच असलेल्या ताळगावचा काही भाग, मेरशी, सांताक्रुझ व अन्य ठिकाणी गेल्या शनिवारपासून वीजपुरवठा बंदच आहे. बार्देश, डिचोली, पेडणे, सत्तरी या तालुक्यांमधील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाडांची तसेच फांद्यांची पडझड झाल्याने वीजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. वीज खात्याचे कर्मचारी सध्या नादुस्त झालेले ट्रान्स्फॉर्मर तसेच फिडर दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत. अनेक ग्रामीण भागात वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीजवाहिन्याच तुटल्याने त्या दुरुस्त करताना पावसाचा व्यत्यय येत असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे विलंब...
राज्यात चक्रीवादळामुळे झालेली पडझड मोठ्या प्रमाणात आहे. खात्याकडे असलेले मनुष्यबळ काम करण्यास अपुरे पडत आहे. विजेचे खांब मोडून पडले आहेत. त्या जागी नवीन खांब उभारण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर कामगार मागवण्यात आले आहेत. मात्र, ते अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे कामात अडथळे येत आहेत. निकामी झालेले ट्रान्स्फॉर्मर व फिडर दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागेल. वीज कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.