Akhtar Raza Murder Case Dainik Gomantak
गोवा

Nesai Murder Case: अख्तर रजा खून प्रकरणाचा 24 तासात पर्दाफाश !

राय येथील नागरिकांनी निरीक्षक गावडे यांचा सत्कार केला

Sumit Tambekar

मडगाव: दिकरपाली येथील मासे विक्रेता अख्तर रजा खुनाचा अवघ्या 24 तासात छडा लावल्याने आज राय येथील नागरिकांनी निरीक्षक गावडे यांचा सत्कार करण्यात आला. गावडे यांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी भाजप नेते अँथनी बार्बोजा यांनी म्हटले. (Citizens felicitated the police in akhtar raza murder case )

अख्तर रजा याचा मागच्या सोमवारी खून केला होता. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गुरुवारी नेसाय कालव्याच्या बाजूला आधळून आला होता. हा मृतदेह कुजल्याने त्याचा चेहरा ओळख पटविण्यासारखा उरला नसताना फक्त त्याने घातलेल्या चापलावरून त्याची ओळख पटली होती. हा खून कुणी केला याचा कुठलाही मागमूस नसताना केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या छबीच्या आधारे पोलीस खून्यापर्यंत पोहोचले होते. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी खुन्याला अटक केली होती.

यावर बार्बोजा म्हणाले, ही अगदी ब्लाइंड केस होती पण गावडे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ती सोडवून दाखवली. त्यामुळे गावडे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पण अशा कर्तबगार पोलीसांची नेमणूक करून कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवणारे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही कौतुकास पात्र आहेत. यावेळी डॉ. स्नेहा भागवत व व्हींसी क्वादृश यांनीही निरीक्षक गावडे व इतरांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT