Govind Gaude VS Vijai Sardesai: आमदार सरदेसाई यांच्या आरोपामागे खंडणीचा वास; हिंमत असेल तर; मंत्री गावडे यांनी दिले खुले आव्हान

'त्याला' स्वप्नात ही गोविंद गावडे दिसत असेल;
Govind Gaude
Govind Gaude Dainik Gomantak
Published on
Updated on

गेले काही दिवस गोवा राज्यात धान्य तस्करी प्रकरणावरुन 'गोवा फॉरवर्ड'ने गोवा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आरोप करताना आमदार विजय सरदेसाई यांनी आतातरी मुख्यमंत्री घोटाळेबाजांवर कारवाई करणार का? असा संतप्त केला आहे. याला प्रतिउत्तर देताना मंत्री गोविंद गावडे यांनी आमदार सरदेसाई यांच्या आरोपामागे खंडणीचा वास येत असल्याचे म्हटले आहे.

(minister govind claims that Vijai Sardesai allegation is for extortion )

आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सरदेसाई यांना प्रतिउत्तर देत, शेलक्या शब्दात आमदार सरदेसाई यांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, ज्या झाडाला फळे लागतात, त्याच झाडाला दगड मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच गोव्याच्या कार्यक्षम प्रशासनावर सरदेसाई हे आरोप करत आहेत. असे ते म्हणाले. आमदार सरदेसाई यांना आता स्वप्नात देखील गोविंद गावडेच दिसत असणार असे ते म्हणाले.

Govind Gaude
IFFI53 Opening Ceremony: इफ्फीचा काउंटडाऊन सुरू, सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवासाठी गोवा सज्ज

धान्य चोरी प्रकरणावर बोलण्यासाठी माझ्याकडे आता हा विभाग नाही, मात्र तरी देखील सरदेसाई हे माझ्या ( गावडे ) यांच्या नावाचाच जप करतायेत. या पुर्वी माझ्याकडे हा विभाग होता. त्यामुळे माझा कारभार राज्यातील नागरीकांना चांगलाच माहित आहे. आता आमदार सरदेसाई यांना काम नाही धंदा नाही, त्यामुळे ते केवळ आणि केवळ टिका करणे हेच त्यांचे आता काम झाले आहे. असे ते म्हणाले.

Govind Gaude
Vijai Sardesai on Ration Scam : गोव्यात लुटारुंसाठी 'All is Well'; धान्य घोटाळ्यावरुन सरदेसाईंची बोचरी टीका

सरदेसाई यांची ही तडफड सक्तीच्या वसुलीकरता आहे का? अशी शंका आता येत आहे. त्यामुळे त्यांनी आपला उद्देश स्पष्ट करावा म्हणजे त्याप्रमाणे नागरीक समजून जातील असे ही ते म्हणाले. अशा प्रकारे गोविंद गावडे यांनी आमदार विजय सरदेसाई यांनी केलेले आरोप हे केवळ आणि केवळ व्यक्तीगत हव्यासापोटी करत असल्याचा टोला मंत्री गावडे यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com