Cortalim Traffic Dainik Gomantak
गोवा

Cortalim Traffic: कुठ्ठाळी-आगशी वाहतुक कोंडी सुटेना; प्रशासन सहनशक्तीचा अंत पाहतेय का?

होमगार्डच्या खांद्यावर जबाबदारी सोपवत वरिष्ठ अधिकारी नामानिराळे असल्याचा नागरिकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को: मडगाव-पणजी मुख्य रस्त्यावर कुठ्ठाळी-आगशी दरम्यान वाहतुकीची कोंडी ही आता नित्याचीच बाब ठरू लागलेली असली तरी गेले काही दिवस ती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे या एक तासाच्या प्रवासाला आत अडीच ते तीन तास लागू लागले आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांच्या सहनशक्तीचा अंत होताना दिसत आहे.

(Citizens demand to solve Cortalim to Agassaim traffic jam problem)

नव्या जुवारी पुलाच्या बांधकामामुळे हे प्रकार होत आहेत. हे खरे असले तरी वाहतूक पोलिस व वाहतूक खाते यांनी या प्रकरणी सुधारणा करण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नसल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. या भागात सामान्य वाहतूक पोलिस व होमगार्डच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून वरिष्ठ अधिकारी आराम करत आहेत, असेच चित्र आहे अधिकाऱ्यांनी या भागात प्रत्यक्ष हजर होऊन त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न केलेले नाहीत, असा आरोप या मार्गावर रोज प्रवास करणारे प्रवासी उघडपणे करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आगशी बगलमार्गावरून विमानतळाकडे जाणाऱ्या टॅक्सी ह्या वाहतूक खोळंबलेली असतानाही तिसरी रांग करून पुढे जातात व त्यामुळे पुढे आणखी कोंडी होते. या सर्व समस्येवर मात करण्यासाठी या भागांत वाहतूक पोलिस अधिकारी व वाहतूक खात्याचे निरीक्षक तैनात करावेत, अशी मागणीही लोक करत आहेत. मागे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली होती व सूचना दिल्या होत्या; पण नंतर त्या सूचना तशाच राहिल्या.

जुवारी पुलाजवळ कुठ्ठाळी फेरी धक्क्याकडे जाणारा रस्ता तसेच आगशी बाजूने आगशी-गोवा वेल्हाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाका हीच वाहतूक खोळंबण्याची मुख्य केंद्रे ठरतायेत. त्यामुळेच वाहतूक खोळंबते. दरम्यान आज कुठ्ठाळी-आगशी दरम्यान वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कुठ्ठाळी जंक्शन ते सांकवाळ, तसेच या व्यतिरिक्त कुठ्ठाळी जंक्शन ते संत्रात व कुठ्ठाळी जंक्शन ते आगशी दरम्यान चक्का जाम झाल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT