RT-PCR चाचणी Dainik Gomantak
गोवा

गोव्यातून मुंबईत जाताय? RT-PCR चाचणीतून मिळणार दिलासा

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या दोन डोस घेतलेल्या नागरिकांना RT-PCR चाचणीतून दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट थोपवून लावण्यात मुंबई पालिकेला यश आले असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तंज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी आणि विशेषत: व्यावसायिक वर्गासाठी देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान RT-PCR चाचणी बंधनकारक ठेवू नये, अशी मागणी मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्य सरकारला केली आहे. आयुक्तांनी अशा आशयाचे एक पत्र राज्य सरकारला दिले. आणि राज्य सरकारनेही या पत्राला मंजुरी दिली त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या दोन डोस घेतलेल्या नागरिकांना RT-PCR चाचणीतून दिलासा मिळणार आहे. (Citizens coming to Mumbai from Goa will not have to undergo RT-PCR test)

कोरोना काळात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांना आणि नागरीकांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. गुजरात, गोवा, राजस्थान, केरळ या राज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला RT-PCR चाचणी करणे बंधनकारक होती. परंतु, आता महाराष्ट्रातील पर्यटन आणि उद्योग या दोन्ही गोष्टींचा विचार करता नवीन नियम लागू करावा अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे. ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना RT-PCR चाचणीतून वगळण्यात यावे, यासाठी आयुक्तांनी पत्र दिले होते आणि राज्य सरकारने या पत्रकास मंजूरी दिल्याची माहिती मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

SCROLL FOR NEXT