Mapusa News: म्हापसा, हणजुणे, कोलवाळ येथे बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर, विक्रेत्यांवर म्हापसा पोलिसांनी कारवाई केली. दुकानमालक आणि विक्रेत्यांविरोधात आवश्यत कारवाई सुरू केली आहे.
म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी म्हणाले की, या प्रकरणी समसुद्दीन जमीर शेख याला अटक करण्यात आली आहे. तो वेर्ला कानका, बार्देश येथील रहिवासी आहे. त्याच्यावर गोवा दमण दीव सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामुशे गिरी येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तो करत होता.
हणजुणे पोलिसांनी इब्राहिम अझिमुल्ला याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो हडपडे येथे राहत असून मूळचा मध्यप्रदेशातील आहे. त्याच्याकडून बेकायदेशीररित्या साठा करून ठेवलेल्या 40 हजार हून अधिक रूपयांच्या सिगारेट्स जप्त करण्यात आल्या आहेत.
कोलवाळ पोलिस ठाण्यात वरील कायद्यानुसार अरुण कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मूळचा माडेल येथीर रहिवाशी आहे. त्याच्या गणेश जनरल स्टोअर्समधून 3000 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय
राम राज निशाद यालाही अटक करण्यात आली आहे. तो मूळचा अलाहाबाद उत्तर प्रदेशचा आहे. त्याने शिरसई येथील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या दुकानात तंबाखूजन्य उत्पादने ठेवली होती. त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून त्याच्याकडून 1380 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, वरील कायद्यानुसार या वर्षात आत्तापर्यंत एकूण 1045 प्रकरणे नोंदवली गेली असून 2 लाख 9 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.