Vijai Sardesai: सरकारने ABVP ला 10 लाख रूपये दिले; तुमच्या संघटनेसाठी सरकारचे पैसे का वापरता?

आमदार विजय सरदेसाईंचा सवाल; ड्रग रॅकेट उद्धवस्त करण्यात हैदराबाद पोलिसांना गोव्याने सहकार्य केले नाही
Vijai Sardesai file photo
Vijai Sardesai file photoDainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गुरूवारी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध आमदारांना उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे दिली. त्यानंतर बोलायला उभे राहिलेल्या आमदार विजय सरदेसाई यांनी एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेला सरकारने 10 लाख रूपये दिल्याचा आरोप केला.

Vijai Sardesai file photo
Goa G20 Meeting: गोव्यात यापुढे पर्यटकांसाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनेच; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार सरदेसाई सभागृहात बोलताना म्हणाले की, सरकारमधील मंत्री म्हणतात की, आम्ही इव्हेंट उगीच करत नाही. आम्ही काम करतो आणि मग इव्हेंट करतो. पण उद्या जर तुमच्या विभागाची कॅग चौकशी झाली तर?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ला तुम्ही 10 लाख रूपये दिले. तुमची विद्यार्थी संघटना म्हणून तुम्हीच पैसे देता? तेही सरकारचे पैसे. हे योग्य आहे का? असा सवाल विजय सरदेसाई यांनी केला.

राज्य कर्जाच्या जाळ्यात अडकत चालले आहे. प्रशासन तुमच्या दारीमध्ये किती याचिका आल्या, किती प्रश्न सुटले. हे सरकार पास झालेले नाही, काठावरही पास झालेले नाहीतर तुम्हाला वर ढकलून ढकलून पास केले गेले आहे.

ड्रग्ज बंदीसाठी फ्री हँड दिल्याचे सरकार सांगते. पण हैदराबाद पोलिस जेव्हा तपासाला आला तेव्हा ते म्हणाले की गोव्याचे पोलिस सहकार्यच करत नाही. ते इंटरनॅशनल ड्रग रॅकेट उद्धवस्त करत आहेत. आणि आपले पोलिस काय करत आहेत? भटक्या जनावरांबाबत फक्त घोषणा झाल्या, कार्यवाही काहीही झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com