Kokan Railway News: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

कुडाळ-झाराप दरम्यान मुसळधार पावसामुळे तीन तास विलंब
Kokan Railway
Kokan RailwayDainik Gomantak

Kokan Railway News: मुंबई ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गावरील तीन रेल्वे गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. कुडाळ ते झाराप या भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे.

Kokan Railway
Vijai Sardesai: सरकारने ABVP ला 10 लाख रूपये दिले; तुमच्या संघटनेसाठी सरकारचे पैसे का वापरता?

ट्रेन क्रमांक 01140 मडगाव ते नागपरू स्पेशल गाडी ही रेल्वे 20 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता मडगाव येथून सुटणार होती. ती तीन तास उशिराने सुटेल. म्हणजेच ही गाडी रात्री 10 वाजता सुटेल.

ट्रेन क्रमांक 20112 मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही कोकणकन्या एक्सप्रेस गाडी 20 जुलै रोजी 6 वाजता सुटणार होती ती देखील तीन तास विलंबाने म्हणजे रात्री 9 वाजता सुटली.

तर ट्रेन क्रमांक 11004 सावंतवाडी ते दादर तुतारी एक्सप्रेस 20 जुलै रोजी 5 वाजून 55 मिनिटांनी सुटणार होती. ही रेल्वेगाडी देखील तीन तास उशिरा म्हणजे रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी सुटली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com