Churchill Alemao Dianik Gomantak
गोवा

Churchill Alemao: 'चर्चिल भाजपचे वेल विशर, पण...', आलेमाव यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल तानावडे काय म्हणाले?

चर्चिल भाजप पक्षात सामील होणार का याबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी माहिती दिली.

सुशांत कुंकळयेकर

चर्चिल आलेमाव हे सुरुवातीपासून भाजप पक्षाचे 'वेल व्हिशर' आहेत पण भाजप प्रवेश करण्याबाबत त्यांनी अजून तरी कोणतेही संकेत दिलेले नाहीत असा खुलासा भाजप प्रदेशाअध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे.

हल्लीच चर्चिल आलेमाव यांनी राज्यांतील तसेच केंद्रातील भाजप सरकारचे गोडवे गाताना लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर भाजप जिंकून येईल असे भाकीत केले होते. या नंतर चर्चिल भाजप पक्षात सामील होतील या चर्चेने जोर धरला होता.

याबद्दल तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'चर्चिल आलेमाव हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे चांगले मित्र आहेत. सावंत यांच्या चांगल्या निर्णयांची त्यांनी सदोदित वाखाणणी केली आहे. पण भाजप पक्षात सामील होण्यासाठी ते अजून मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेही बोललेले नाहीत किंवा माझ्याकडेही बोलले नाहीत. त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला तर त्यावर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल.' असे ते म्हणाले.

'गोव्यात भाजप सरकारने काम केले आहे ते पाहिल्यास दोन्ही जागांवर भाजप उमेदवार जिंकून येतील ही गोष्ट 100 टक्के खरी आहे.' असे तानावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT