Churchill Alemao

 

Dainik Gomantak

गोवा

'गोवा राज्याच्या सीमा त्वरित सील करा'

कोव्हिड रुग्ण वाढू लागल्याने चर्चिल आलेमाव यांची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात कोव्हिडचे रुग्ण वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्याच्या सीमा त्वरित सील कराव्या, अशी मागणी तृणमुलचे नेते चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी आज केली. कालच्या एकाच दिवशी कोविडचे 112 नवीन रुग्ण आढळून आले. प्रत्यक्षात ही संख्या 400 ते 500 रुग्णांच्या घरात असण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही यावेळी देवाच्या दयेने ख्रिसमस (Christmas) चांगल्या रीतीने साजरा केला. जर नवीन वर्षही चांगल्या रीतीने साजरे करायचे असल्यास गोव्यात येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घातलेच पाहिजेत, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती आलेमाव यांनी व्यक्त केली.

गोव्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची कसून तपासणी व्हायला पाहिजे. रेल्वे स्थानके आणि विमानतळावर (Airport) तपासणी यंत्रणा उभी करण्याची गरज आलेमाव यांनी व्यक्त केली.

सध्या उत्तर गोव्यात सुरु असलेला सनबर्न संगीत महोत्सव (Sunburn Festival) ताबडतोब बंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली. गोव्यात स्थिती धोकादायक होऊ पाहत असताना असले महोत्सव का असा सवाल करुन कोणत्या मंत्र्याला हा महोत्सव पाहिजे असा थेट सवालही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT