Church bulletin warns Manipur like situation in Goa Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात मणिपूरसारखा हिंसाचार होण्याची शक्यता'; चर्चच्या बुलेटिनमधून व्यक्त केली चिंता

गोव्यात मागील दोन महिन्यात घडलेल्या मुख्य दोन घटनांमुळे धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

Pramod Yadav

Church bulletin warns Manipur like situation in Goa: मणिपूर हिंसाचाराचे पडसाद देशात सर्वत्र उमटले. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवासापासून यावर चर्चेसाठी विरोधकांनी मागणी लावून धरली. गोव्यात मागील दोन महिन्यात घडलेल्या मुख्य दोन घटनांमुळे धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

गोवा आणि दीव दमणमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकात गोव्यात मणिपूरसारखी हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यादिशेने राज्याची वाटचाल सुरू असल्याची भीती यात प्रसिद्ध झालेल्या लेखातून व्यक्त केलीय.

गोवा आणि दीव दमण आर्कडायोसीसच्या 'रिनिव्हल नोव्सोर्नी रेनोव्हाकाओ’ या नियतकालिकात एफ ई नोरोन्हा यांनी हा लेख लिहला आहे. नोरोन्हा रेनोव्हाकाओच्या संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत.

"रात्रीच्या पार्ट्यांमध्ये मते वाया घालवल्यानंतर आम्हाला राजकीय मूर्खपणाचे मिळायचे ते फळ मिळाले आहे. पराभवामुळे पक्षांतरांची दुसरी फेरी सुरू झाली. गोवा म्हादईच्या उथळ पाण्यात बुडत असताना, आमचे तरूण येथील सरकार, व्यवसाय चालवण्याऐवजी इतरांची सेवा करण्यासाठी परदेशात जाण्यात व्यस्त आहेत."

"पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा नष्ट करण्यााबाबत बोलले जात आहे, ही येऊ घातलेल्या हिंसाचाराची तयारी आहे." असे नोरोन्हा यांनी लेखात म्हटले आहे.

"गोवावासीयांनी पोकळ अहंकार बाजूला ठेवून एकत्र यावे, अहंकार निरर्थक आहेत. तुमच्याकडे अभिमान बाळगण्यासारखं काहीच नाही, गेल्या 40 वर्षात तुम्ही गोवा उद्ध्वस्त केला आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही धर्मनिरपेक्ष लोकांना एकत्र आणत, राज्यातून दोन धर्मनिरपेक्ष प्रतिनिधी दिल्लीत पाठवा."

"तुमच्यात थोडे जरी काही ज्ञान शिल्लक असल्यास, तुमच्या सुखर जीवनशैलीतून थोडा वेळ काढा, आणि तुमच्या भूमीच्या भवितव्याबाबत विचार करा." असेही या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

फादर बोलमॅक्स यांचे वादग्रस्त वक्तव्य

फादर बोलमॅक्स यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय हिरो पण देव नाही असे त्यांनी केलेल्या उपदेशात वक्तव्य केले. काही हिंदूंनी शिवाजी महाराजांना देव केले असून, आपण त्यांना समजवायला हवे की ते देव नाहीत.

या वक्तव्यामुळे शिवप्रेमींनी बोलमॅक्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. वास्कोत शिवप्रेमींनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलमॅक्स यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाला होता. अखेर सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला. दोन महिन्याच्या आत या दोन घटना घडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT