Pope Francis Death News X
गोवा

Pope Francis Death: गोव्यातील चर्चमध्ये शोक व्यक्त करण्यासाठी घंटानाद! पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली; आर्चबिशप जाणार व्हॅटिकनला

Pope Francis Death Goa Church Bells: पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील चर्चमध्ये उद्या व परवा घंटानाद केला जाणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील चर्चमध्ये उद्या व परवा घंटानाद केला जाणार आहे. पोप यांच्या पार्थिव दफनदिनीसुद्धा चर्चमध्ये घंटानाद केला जाणार आहे. बिशप हाऊसमधील चान्सलर फादर रोमिओ मोंतेरो यांनी तशी सूचना जारी केली आहे. पोप यांना श्रद्धांजली वाहणारे संदेश अनेकांनी जारी केले आहेत. नव्या पोपची निवड करण्यासाठी कार्डिनलांची बैठक घेतली जाते. त्यासाठी आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्राव व्हॅटिकनला रवाना होणार आहेत.

शाश्‍वत शांती लाभो!

त्यांच्या चर्चविषयी असलेल्या अढळ निष्ठा, शांततेचा प्रसार, धर्मांतर संवाद, सामाजिक न्याय व सृष्टीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील व आदराने जपले जाईल. समाजाच्या कडेला असणाऱ्यांपर्यंत देवाचे प्रेम पोहोचवण्याचा त्यांचा अपार प्रयत्न, निराश झालेल्यांना आशा देणे आणि जखमींना चर्चच्या उपचारक्षमतेचा अनुभव देणे, हे सर्व ख्रिस्ताच्या खऱ्या रूपाचे प्रतिबिंब होते. त्यांच्या आत्म्याला शाश्वत शांती लाभो, हीच प्रार्थना, असे आर्चबिशप फिलीप नेरी म्हणाले.

कल्याणासाठी कार्य!

पोप फ्रान्सिस हे नम्रता, करुणा आणि न्याय, शांतता तसेच गरीब व उपेक्षितांच्या कल्याणासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यासाठी सर्व धर्मातील लोकांत आदरणीय होते. विविध समाजांमध्ये परस्पर समज आणि धार्मिक संवाद वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न जागतिक ऐक्य आणि मानवी एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले. गोवा, भारत तसेच संपूर्ण जगभरातील ख्रिस्ती बांधवांसह व्हॅटिकन व जागतिक कॅथोलिक समुदायाला आम्ही मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. संपूर्ण मानवजातीसाठी न्याय, दया आणि सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणारे नेते लाभोत, अशी प्रार्थना, राज्याध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद, गोवा आसिफ हुसेन यांनी केली.

मानवतेला स्पर्श!

जेव्हा पोप परमपित्याकडे परतले, तेव्हा आपण सर्वांनी त्यांच्या मृदू नम्रतेचा, प्रगत विचारसरणीशी केलेल्या धाडसी मैत्रीचा, आणि त्यांच्या नावाशी एकनिष्ठ राहून गरिबांशी व वंचितांशी दाखवलेल्या अढळ सहवेदनेचा, अंतःकरणपूर्वक विचार करायला हवा. त्यांनी आपल्या शब्दांमधून आणि कृतीतून केवळ धर्माच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत, तर संपूर्ण मानवतेला स्पर्श केला. या अढळनीय आणि अपरिवर्तनीय नुकसानीच्या दुःखात मी माझ्या समस्त गोमंतकीय बांधवांसह आणि संपूर्ण जगासोबत सहभागी आहे, अशी श्रद्धांजली गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

कॅथोलिक ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च नेते २६६वे पोप फ्रान्सिस ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील ते लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप होते. गरीब आणि युद्धग्रस्त देशांमधील पीडित लोकांबद्दल वारंवार काळजी व्यक्त करत त्यांना जगाला प्रेमाचा आणि माणुसकीचा संदेश दिला होता.

केंद्र सरकारने तीन दिवसांचा राष्‍ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्‍यामुळे उद्या व दफनाच्‍या दिवशी राष्‍ट्रध्‍वज अर्ध्यावर फडकवण्‍यात येतील. तसा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे.व्हॅटिकनमधील कार्डिनल केव्हिन फेरेल यांनी पोप फ्रान्सिस यांचे आज सकाळी साडे सात वाजता (व्हॅटिकनमधील वेळेनुसार) निधन झाल्याचे जाहीर केले. पोप फ्रान्सिस हे मागील काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या विकाराने ग्रस्त होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT