Christopher Fonseca  Dainik Gomantak
गोवा

Water Bill Hike : सरकारने पाणी दरवाढ मागे घ्यावी; ख्रिस्तोफर फोन्सेका आक्रमक

16 हजार लिटर मोफत पाणी ही केवळ वल्गनाच असल्याचाही आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Water Bill Hike : सरकारने पाणी दरात जी पाच टक्क्यांची वाढ घोषित केली आहे, ती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ॲड. सुहास नाईक, ॲड. राजू मंगेशकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीपूर्वी भाजपने 16 हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती. ती फक्त वल्गना असून त्याला जनता बळी पडली. 6 महिन्यांच्या आत भाजप वचन विसरले आणि पाणी दरवाढ केली. न फुटण्याची शपथ धुळीस मिळवून कॉंग्रेसचे आमदार भाजपमध्ये गेले. त्यामुळे राजकारण म्हणजे लोकांना आता विनोदच वाटू लागला आहे, असे फोन्सेका म्हणाले. गोव्याच्या डोईवरचे कर्ज 23 हजार कोटींवर पोहचले आहे. सरकारची करवाढ चालूच आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ होतच आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे ते म्हणाले.

सक्रियपणे निवडणूक लढवणार

मागची निवडणूक पक्षाने लढवली नाही. यापुढे पक्ष सक्रियपणे राजकारणात उतरणार असल्याची घोषणा फोन्सेका यांनी केली. कामगार चळवळ, पर्यावरण विषयांत या पक्षाने भरपूर काम केले आहे. देशाचे भविष्य बदलण्याची ताकद कामगारांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी अंबाला येथे गोवा मुक्ती संग्रामातील दिवंगतांच्या पत्नींना धनादेश दिला, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नींना वंचित ठेवू नये, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT