Big Foot Museum Dainik Gomantak
गोवा

Christmas in Goa: बिग फूटमध्ये साकारलीये अनोखी कारागिरी; गोव्यात आहात मग लोटलीला जाऊन आलात का?

Big Foot Museum Goa: ख्रिसमसच्या निमिताने गोव्याला आला असाल तर इथे तुम्हाला आवडण्यासारखी एक जागा आहे

Akshata Chhatre

Big Foot Museum Lotli Christmas Decoration

पणजी: ख्रिसमसचा सण म्हटलं की साहजिकपणे आपल्या डोळ्यांसमोर गोवा हे नाव उभं राहतं. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गोव्यात ख्रिसमसची बरीच धूम आहे. जागोजागी रोषणाई, झगमगाट आणि सजावट पाहायला मिळतेय. तुम्ही जर का ख्रिसमसच्या निमिताने गोव्याला आला असाल तर इथे एक तुम्हाला आवडण्यासारखी जागा आहे आणि यंदाच्या वर्षी या खास जागेत ख्रिसमसचं उत्तम डेकोरेशन देखील केलंय. कुठे माहितीये का? लोटलीमधल्या बिग फूटमध्ये.

सध्या लोटली येथील बिग फूट या संग्रहालयात नाताळ सणानिमित्त महेंद्र अल्वारीस यांनी परंपरेला छेद देत तयार केलेला गोठा रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.टाकाऊतून मौल्यवान कारागिरीची निर्मिती सुंदरतेने केल्याचे या ठिकाणी पहायला मिळते, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. ही कलाकृती आगळा संदेशही देणारी आहे.

प्रेम, शांती आणि माया हे या मोसमातील मूल्यांचे संकलित सार या कलाकृतीतून रेखांकीत होते. या कलाकृतीच्या निर्मितीसाठी कलाकाराने जुने पुठ्ठ्यांचे बॉक्स, शिल्लक आवरणे, साधे गोंद यांचा वापर केला आहे. संवर्धनासाठी संरक्षण आणि आपल्या मुलांना राहण्यायोग्य असा ग्रह संवर्धित करण्याची सुनिश्‍चिती, असा संदेश या कलाकृतीतून देण्यात आला आहे.

शिवाय इथे ख्रिसमसच्या निमित्ताने सांता क्लॉस सुद्धा तयार करण्यात आला आहे. सायकल सोबत उभा असलेला हा भलामोठा सांता अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. तुमच्यासोबत जर का लहान मुलं असतील तर त्यांना हा सांता दाखवायला नक्की घेऊन जाऊ शकता. ख्रिसमसच्या निमिताने महेंद्र अल्वारीस यांनी उभारलेल्या या देखाव्याला पाहण्यासाठी गोव्यातील अनेक शाळकरी मुलांनी सुद्धा भेट दिली आहे. महेंद्र अल्वारीस यांनी बिग फूटमध्ये ट्री ऑफ विष पण चित्रित केली आहे, जिथे तुम्ही तुमची इच्छा नक्कीच लिहू शकता. महेंद्र अल्वारीस एक कलाकार आहेत आणि ख्रिसमस निमित्त त्यांनी साकारलेली कलाकारी अनेकांचं लक्ष वेधून घेतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दुसऱ्या महायुद्धामुळे व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी हुकूमशहा हिटलरला लिहली होती दोन पत्रं; काय लिहलं होतं पत्रात? वाचा

Battle of Longewala: 1971 चा रणसंग्राम; एका रात्रीत पाकिस्तानच्या 36 रणगाड्यांचा खात्मा! काय आहे 'लोंगेवाला युद्धा'ची कहाणी?

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

SCROLL FOR NEXT