Five Deaths Goa Christmas: गोव्यात नाताळच्या सणाला गालबोट, पाच विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू

Goa Christmas: नाताळ, सनबर्न आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, नाताळच्या दिवशी राज्यात विविध घटनांनी गोवा हादरला.
Five Deaths Goa Christmas: गोव्यात नाताळच्या सणाला गालबोट, पाच विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
Five Deaths Goa ChristmasDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात बुधवारचा दिवस घातवार ठरला आहे. नाताळच्या दिवशीच राज्यात घडलेल्या विविध पाच घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात बोट बुडाल्याची घटना, गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना आणि तीन विविध अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नाताळच्या दिवशीच घडलेल्या या घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागले आहे.

१) कळंगुट येथे बोट उलटल्याने एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

कळंगुट समुद्रात जलपर्यटनासाठी गेलेली बोट बुडाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी घडली यात १३ प्रवासी होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन लहान मुले जखमी झाली आहेत. इतरांवर रुग्णालया उपचार सुरु आहेत. सूर्यकांत पोफळकर (वय ४५, रा. खेड) असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

२) शिकारीसाठी गेलेल्या वाळपईतील युवकाचा मृत्यू

सत्तरीतील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तीन युवकापैकी एकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारीच उघडकीस आली. समद खान (नानूस - वाळपई) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे. पोलिसांनी शिकारीसाठी वापरण्यात आलेली बंदूक देखील जप्त केली.

Five Deaths Goa Christmas: गोव्यात नाताळच्या सणाला गालबोट, पाच विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, सुट्ट्यांमुळे कोकणात जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी

३) पारोडा येथे दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

पारोडा येथे २५ डिसेंबरला सकाळी ८.४५ वाजता झालेल्या अपघातात ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रोशन मुजावर (शिरवई - केपे) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ओव्हरटेकच्या मोहात हा अपघात झाला.

४) श्री अनंताच्या मंदिरासमोरील तळीत बुडून एकाचा मृत्यू 

फोंडा तालुक्यातील श्री अनंताच्या मंदिरासमोर असलेल्या तळीत बुडून तुळशीदास दत्ता पालकर (वेलकास, सावईवेरे, वय ४२ वर्षे) याचा बुडून मृत्यू झाला. तुळशीदास उत्तम जलतरणपटू होता, पोहताना हृदयविकाराचा झटका वा फीट आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

Five Deaths Goa Christmas: गोव्यात नाताळच्या सणाला गालबोट, पाच विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
Goa Accident: ओव्हरटेकचा मोह दुसऱ्याच्या जीवावर बेतला; पारोडा येथे दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

५) भाटी - गोवा वेल्हा येथे कार अपघातात एकाचा मृत्यू

भाटी - गोवा वेल्हा येथे घराच्या संरक्षक भिंतीला कार धडकून अपघात झाल्याची घटना घडली. यात फ्रान्सिस ब्रागांझा (४३ , रा. भाटी ) याचा मृत्यू झाला असून, कारमध्ये असलेल्या आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com