Christmas celebration

 

Dainik gomantak

गोवा

नाताळ उत्सव दोन दिवसांवर, दुकाने सजावटीच्या साहित्यांनी सजली

गोठे सजावटीच्या कामाला युवक व्यस्त असल्याने नाताळ सणाचा माहोल तयार झाला आहे.

दैनिक गोमन्तक

नव्या वर्षाची चाहूल घेऊन येणाऱ्या नाताळ उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र बाजारपेठा फुलून निघाल्या आहेत. अनेक दुकाने सजावटीसाठीच्या साहित्यांनी सजली आहेत. पर्यटकांची संख्याही वाढू लागल्याने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोठे सजावटीच्या कामाला युवक व्यस्त असल्याने नाताळ सणाचा माहोल तयार झाला आहे.

वास्कोत अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी बाजारपेठाही विविध रंगानी सजलेल्या आहेत. विविध आकारातील रौप्य आणि सुवर्ण रंगातील विविध डिझाईन्सच्या वेगवेगळ्या आकारातील सांता, सांताचे मुखवटे, लहान मुलांसाठी सांताचे ड्रेस, सांताची टोपी, ख्रिसमस ट्री, येशू जन्माचा प्रसंग दाखविणारी तयार दृश्ये, येशू जन्माच्या देखाव्यासाठी मूर्ती, लाकडी व थर्माकॉलच्या गोठा, विविध प्रकारचे मुकूट, स्टिकर्स,सजावटीच्या वस्तू, विद्युत माळा, चांदण्यांच्या आकारातील कंदील, विविध आकारातील मेणबत्त्या असे अनेक प्रकारचे साहित्य बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. ग्राहकांची बाजारपेठेत गर्दीही वाढत आहे. लॅमिंग्टन, चॉकलेट आणि कॉफ़ीकेक, रम केक, ख्रिसमससाठीचा खास फ्रुट केक, बाटिका, बासबुसा,

ब्राऊनी, बिबिन्का, दोदोल, दोस अशी मिठाई देखील बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.वास्कोत ख्रिसमसचे (Christmas) एक वेगळेच वातावरण (Atmosphere) पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT