Christmas Festival : गोवेकरांना वेध लागले नाताळ आणि नववर्षाचे..! Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांना वेध लागले नाताळ आणि नववर्षाचे..!

यंदा हे दोन्ही उत्सव उत्साहात साजरे होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमन्तक

गोवा वेल्हा (Christmas Festival) : डिसेंबर महिना उजाडला आणि लोकांना नाताळ व नववर्ष 2022 चे वेध लागायला सुरवात झाली. तिसवाडी, बार्देश, सासष्‍टी, मुरगाव, काणकोण तालुका त्‍याला अपवाद नाही. ठिकठिकाणी या उत्सवाची लगबग दिसून येत आहे. यंदा हे दोन्ही उत्सव (Festival ) उत्साहात साजरे होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संपूर्ण गोवाभर नववर्ष व नाताळ (Christmas) उत्सव मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. त्‍यानिमित्त आठवडाभर त्यांच्या जन्माचे स्वागत व नाताळचे कार्यक्रम आखण्यात लोक गुंतले आहे. गावातली लहान-मोठी गिरिजाघरे तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घराघरांत हा उत्सव साजरा करतात. स्थानिक धर्मगुरुंच्‍या मार्गदर्शनाखाली नाताळ उत्सवाची कामे सुरू झाली आहेत. यामध्‍ये रंगरंगोटी, सजावट, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत आकर्षक गोठे, नक्षत्रे आकार घेत आहेत. चर्चमध्येही उत्‍सवाचे नियोजन करण्‍यासंदर्भात कामे सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT