Chorla Ghat
Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

गोवा-बेळगाव रस्‍त्‍याची चाळण!

दैनिक गोमन्तक

वाळपई: गोवा-बेळगावदरम्यानच्या चोर्लाघाट परिसरातील कर्नाटकच्‍या हद्दीतील प्रमुख रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. यामुळे सदर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा मन:स्‍ताप सहन करावा लागतोय. मोठा अपघात होण्‍यापूर्वी या रस्‍त्‍यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत अशी आग्रही मागणी करण्‍यात येऊ लागली आहे. तसेच या महामार्गाची दुरुस्ती त्वरित हाती न घेतल्यास पुढील आठ दिवसांत चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

(Chorla ghat dangerous Neglect of Karnataka Government)

मिळालेल्‍या माहितीनुसार, गोवा-बेळगावदरम्यानच्या चोर्लाघाट परिसरातून जाणारा हा रस्ता कमी अंतराचा आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक याच रस्त्यावरून जात आहे. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते व ते त्वरित बुजविणे गरजेचे होते. मात्र, त्‍याकडे कर्नाटक शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता पावसाळ्यात सदर रस्‍त्‍याची चाळण झाली आहे. दुसरीकडे गोव्‍याच्‍या हद्दीतील रस्‍ताही खराब झाला होतो. परंतु वाहनचालकांच्‍या मागणीची दखल घेऊन गोवा सरकारने पावसाळ्‍यापूर्वीच त्‍याचे हॉटमिक्स डांबरीकरण केले आहे.

गोवा हद्दीपासून पिळर्णवाडीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे एवढे मोठे आहेत की, त्यातून वाहने काढताना चालकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होत असतो. सध्या पावसाचे पाणी खड्ड्यांत भरल्‍यामुळे वाहनचालकांना त्‍यांचा अंदाज येत आहे.

गोव्‍यातून बेळगावला जाणाऱ्यांची संख्‍या मोठी

पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. यामुळे हा रस्ता चांगल्या स्थितीत राहणार अशी प्रवाशांची समजूत होती. पण सध्याची रस्त्याची दयनीय स्थिती पाहिल्यास वाहतुकीसाठी रस्ता धोकादाय बनू लागला आहे. गोव्यातून बेळगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांना हा रस्‍ता म्‍हणजे डोकेदुखी बनला आहे. आणखीन काही दिवसांनी गणेश चतुर्थीचा सण येणार आहे. गोव्यातील लोक मोठ्या संख्‍येने चतुर्थीच्या खरेदीसाठी बेळगावला जातात. कर्नाटक सरकारने याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ताबडतोब हाती घ्यावे, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

जंगलात वाहन बंद पडले तर नेटवर्कही नाही

कर्नाटकच्‍या हद्दीतील चोर्ला ते जांबोटी हा रस्ताही खड्डेमय बनला आहे. हा भाग पूर्णपणे जंगलातून जातो. त्‍यामुळे वाहकचालकांना धोका संभवतो. शिवाय या भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. त्‍यामुळे खड्ड्यांत वाहन बंद पडले किंवा रुतले तर कोणीशी संपर्क साधणे कठीण होते. अशावेळी दुसऱ्या वाहनातून जांबोटी किंवा गोव्यात येऊन मेकॅनिकलची व्यवस्था करावी लागते, अशी माहिती अनेक प्रवाशांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT