वाडी,शिवोली येथील घरफोडी प्रकरणी 5 जणांना अटक

अंजुना पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना घेतले ताब्यात
Anjuna Police
Anjuna PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

वाडी, शिवोली येथे 15 मे रोजी रात्री झालेल्या घरफोडी झाली होती. या प्रकरणी अंजुना पोलिसांनी कारवाई करत आज 5 जणांना अटक केली आहे. या घरफोडीबाबत तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार घराचा मुख्य दरवाजा तोडून आरोपींनी फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. व यावेळी चोरट्यांनी घरातील सोने, चांदी, प्लॅटिनम, हिऱ्याचे दागिने, लंपास केले होते. ज्याची एकूण किंमत 15,12,610 रुपये इतकी होते.

Anjuna Police
गोवा काँग्रेसधील धुसफूस संपेना; 5 आमदारांना चेन्नईला हलवले

अंजूना पोलीसांनी घरफोडी झाल्यानंतर तातडीने एक पथक तयार केले होते. व तपासाची चक्रे गतीने फिरवल्याने या गुन्ह्याची उकल कमी कालावधीत होऊ शकली आहे. या प्रकरणात पोलीसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मिथुन कुमार परिहार, जगदीश परिहार, अरुणकुमार बद्री तंती, परम उपेंद्र चोडणकर, सुंदर फजलू खान, अशी पोलीसांनी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत.

Anjuna Police
गोवा पंचायत निवडणुक वेळापत्रक जाहीर; आजपासून आचारसंहिता लागू

मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींवर साळगाव पोलीस ठाण्यात झालेल्या घरफोडीच्या आणखी एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ही आरोपींचा सहभाग आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चांदीचे दागिने, चांदीच्या मूर्ती, घड्याळ, सोन्याचे दागिने, कॅमेरा असा 15,12,610 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, या चोरीचा मुख्य आरोपी परम चोडणकर, वय 23 वर्ष रा. बडेम, आसागाव - गोवा हा तक्रारदाराच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असे. त्याने इतर आरोपी श्री. अरुण कुमार या व्यक्तींना घर दाखवले. तसेच इतर आरोपी आसगाव येथील अन्य हॉटेलमध्ये आणि सोकोरो येथील बांधकामाच्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांनी हे सर्व नियोजन चोडणकर याने पुरवलेल्या माहितीच्या आधारे नियोजन केले व त्या प्रमाणे ही घरफोडी करण्यात आली होती. अशी माहिती सध्या समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com