Chlorine Gas Leak Assonora Dainik Gomantak
गोवा

Chlorine Gas Leak Assonora : अस्नोडा जल प्रकल्पात लागली ‘क्लोरीन’ची पुन्हा गळती

प्रादुर्भावामुळे कर्मचारी भयभीत : वेळीच बचावकार्यामुळे दुर्घटना टळली

गोमन्तक डिजिटल टीम

Chlorine Gas Leak Assonora : अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील ‘क्लोरीन’ वायूने भरलेल्या सिलिंडरमधून आज पुन्हा एकदा गॅसची गळती झाल्याने प्रकल्पात मोठा आकांत ओढवला. मात्र, डिचोली अग्निशमन दलाचे जवान तसेच तज्ञांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन गॅसची गळती नियंत्रणात आणल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. गॅसची गळती नियंत्रणात आणल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गॅसची गळती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांना पाचहून अधिक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या गॅसचा परिसरातील लोकवस्तीवर प्रादुर्भाव झाला नाही. तरी प्रकल्प परिसरातील झाडाझुडपांवर प्रादुर्भाव होऊन ती लगेच करपून गेली.

गेल्या मंगळवारी (ता.११) याच सिलिंडरमधून गॅस गळती झाली होती. मात्र, डिचोली अग्निशमन दलाने वेळीच गळती नियंत्रणात आणली होती. पण आज झालेल्या गळतीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होता.

आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रकल्प परिसरातील सिलिंडरमधून ‘क्लोरीन’ या घातक गॅसची गळती होत असल्याचे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना जाणवले. या प्रकारामुळे प्रकल्पातील कर्मचारी भयभीत होऊन प्रकल्पाबाहेर.

अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाला या प्रकाराची माहिती दिली. डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कॉक मोडल्याने त्यातून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

तज्ज्ञ पथकाकडून बचावकार्य

गॅस गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच, अग्निशमन दलातर्फे खोर्ली येथील ‘डीक्केन’ केमिकल्सच्या तज्ञ पथकाला बोलावण्यात आले. अधिकारी गौरीश भेंडे यांच्यासह तज्ञ पथक दुपारी झाले. ३.३० च्या सुमारास गॅस गळती रोखण्यात यश मिळवले.

अग्निशमन चे अधिकारी राहूल देसाई तसेच हवालदार राजन परब, अमोल नाईक, गीतेश नाईक, लवशीन पिल्लाई, योगेश माईणकर, सुनील गावस, अमोल चोर्लेकर, नीलेश हळर्णकर आदींनी मदतकार्यात सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT