Shri Ganesh Murti Making At Canacona Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2024: काणकोणातील चित्रशाळांत वाढली लगबग

Canacona: गणेश चित्र शाळांतून दरवर्षी सरासरी पांच हजार लहान मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती तयार केल्या जातात

गोमन्तक डिजिटल टीम

श्री गणेशासाठी चित्रशाळा जागू लागल्या आहे. काणकोणात पोळे ते गुळे व खोला ते खोतीगावपर्यंत पन्नास पेक्षा जास्त चित्र शाळा या गणेश चित्र शाळांतून दरवर्षी सरासरी पांच हजार लहान मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती तयार केल्या जातात.

काणकोणात अकरा सार्वजनिक गणेश मंडळे व एक पोलिस ठाण्याचा गणपती आहे. बहुतेक हे सर्व गणेश मूर्ती स्थानिक मूर्तिकारांकडून बनवल्या जातात. काणकोणात अभावानेच ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती दिसतात. दरवर्षी चिकणमाती, रंग तसेच मजुरीत वाढ झाल्याने मूर्तींचे दरही मूर्तिकारांना वाढवावे लागतात.

काणकोणात चिकणमातीचा अभाव असल्याने सावंतवाडी व कर्नाटकातील अंकोला, माजाळी या भागातून चिकणमाती आणावी लागत आहे.काणकोणात कदंब बसस्थानकासमोर असलेल्या शेतात मुबलक प्रमाणात चिकण माती उपलब्ध होत होती.

मात्र, गेल्या दहा वर्षांत या शेतीच्या आजूबाजूला बांधकांमे उभी राहिल्याने या मातीत खडे मिसळून ही माती मूर्ती घडविण्यासाठी निरुपयोगी ठरली आहे. या मातीने मूर्ती घडविल्या तर मूर्तीला भेगा पडत असल्याचा मूर्तिकारांचा अनुभव आहे.

कागद्याच्या लगद्यापासून गणेश मूर्ती साकारणारे काणकोणातील एकमेव मूर्तिकार हे मनोज प्रभूगावकर आहेत. दरवर्षी किमान पांच गणेश मूर्ती ते कागदाच्या लगद्यापासून साकारतात. त्यांनी नाविन्य आणून मूर्तिकला जपली आहे.

काणकोणात काही प्रभूगावकर घराण्यांत चिकण मातीच्या गणेश मूर्तीची पूजा न करता पत्रीच्या गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे.या पत्रीच्या गणेशाबरोबरच ते श्री गणेशाची कागदावरील प्रतिमा ते पूजतात.

त्याचीच दुसरी आवृत्ती म्हणून काहीनी कागदी लगद्यांच्या गणपतीची मूर्ती पूजण्यास आरंभ केला. त्याला माशे येथील मनोज प्रभूगावकर यांनी साथ दिली.

कागदाच्या लगद्यात गोंद घालून आपण सुबक मूर्ती साकारल्या. या वजनाने हलक्या असून पर्यावरणपूरकही आहेत. ‘पीओपी’पेक्षा या मूर्ती हलक्या असून गणेश भक्तही गेल्या काही वर्षांपासून या मूर्तीना पसंती देत आहेत. मात्र गणेश भक्तांची भावना म्हणून गणेश मूर्तीच्या जागी चिकण माती ठेवण्यात येते.
मनोज प्रभूगावकर, मूर्तिकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT