Chinchinim Panchayat Dainik Gomantak
गोवा

Chinchinim Panchayat: NH66 लगत कुजलेल्या माशांमुळे दुर्गंधी; चिंचणी ग्रामपंचायतीचे GSPCBला पत्र

यामुळे सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम

Kavya Powar

Chinchinim Panchayat : सध्या चिंचणी ग्रामपंचायत एका गोष्टीमुळे त्रस्त आहे. ग्रामपंचयतीने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (GSPCB) पत्र पाठवून प्रदूषण मंडळाचे लक्ष NH66 वरील खराब आणि कुजलेल्या अवस्थेतील माशांच्या वाहतुकीकडे वेधले आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. यामुळे सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

कारवाईसाठी या पत्राची प्रत कुंकळ्ळी पोलिसांनाही देण्यात आली आहे.

चिंचणीचे सरपंच व्हॅलेंटिनो बॅरेटो यांनी त्यांच्या पत्रात GSPCB सदस्य सचिव शमिला मॉन्टेरो यांना कळवले आहे की, लहान पिक-अप व्हॅन कुंकळ्ळी रस्त्यालगत कुजलेले मासे घेऊन जात आहे. ते बहुधा येथील औद्योगिक वसाहतीमधील फिश मील प्लांटसाठी असावेत. मात्र यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते.

हे छोटे पिक-अप कदाचित कुजलेले खराब मासे विल्हेवाटीसाठी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या फिश मील प्लांटमध्ये मासे घेऊन जात असावेत. मात्र यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढावा, अशी विनंती सरपंचांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sand Mining: महिन्याभरात पाऊस थांबेल, विकासकांची बांधकामे वेग पकडतील; वाळू समस्येचे ‘गँग्रीन’

नवी कोरी गाडी घातली समुद्रात! सुरक्षारक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, हणजूण किनाऱ्यावर पर्यटकाची फजिती; Watch Video

Tillari Accident: ..तिलारीची सहल ठरली अखेरची! ताबा सुटल्याने टेम्पो-दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Goa Shipyard: सांकवाळ येथील जमीन मिळणार गोवा शिपयार्डला, 81 कोटींना मंजुरी; सरकारला बसणार 34 कोटींचा फटका

Mhaji Bus: 'म्हजी बसमुळे अपघात - वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल', CM सावंताचे प्रतिपादन; 4 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण

SCROLL FOR NEXT