Chinchinim Accident Death News Dainik Gomantak
गोवा

Chinchinim Death News: रस्त्यात गाय आडवी आली अन् दोन दुचाकींना बसली कारची धडक; एकाचा दुर्दैवी अंत

कारची धडक बसलेल्या गाईचाही यामध्ये मृत्यू

Kavya Powar

Chinchinim Accident Death News: वागातोर अपघात मृत्यू प्रकरण ताजेच असताना आज सकाळी (शुक्रवार) गुडी चिंचणी येथे एकाचा मृत्यू झाला आहे. दोन दुचाकी आणि चारचाकीमध्ये हा अपघात घडला. गुडीच्या दिशेने येत असलेल्या i-20 कारची रस्त्यावरील गाईला धडक बसली.

उपलब्ध माहितीनुसार, गुडीच्या दिशेने येत असलेल्या कारचालकाची (शेल्टन फुतार्दो, ओर्ली) धडक रस्त्यात आडव्या आलेल्या गाईला बसली. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दोन दुचाकी आणि कारमध्ये जोरदार टक्कर झाली.

यामध्ये दोन दुचाकींवरील आग्नेल रिबेलो (19), मेक्लोइड रिबेलो (17) आणि अबनेर परेरा (21) हे तिघेही जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये आग्नेल रिबेलो याचा मृत्यू झाला आहे.

तसेच कारची धडक बसलेल्या गाईचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलीस संबंधित घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT