Chimbel Unity Mall, Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Chimbel: 'चिंबल प्रकल्प रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन'! युरी आलेमाव यांचा इशारा; नागरिकांना दिला पाठिंबा

Yuri Alemao: आंदोलनकर्त्या एसटी समाजाच्या नागरिकांची आलेमाव यांनी भेट घेतली. या वेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता तसेच काँग्रेस नेते समील वळवईकर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल गावात प्रस्तावित असलेल्या ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ या प्रकल्पांविरोधात अनुसूचित जमाती समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत, भाजपने एसटी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला असून त्यांच्या हक्कांचे आणि जमिनीचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप केला.

स्थानिकांच्या इच्छेविरोधात आणि दलदलीच्या जमिनीवर हे प्रकल्प राबवले जात असल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनकर्त्या एसटी समाजाच्या नागरिकांची आलेमाव यांनी भेट घेतली. या वेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता तसेच काँग्रेस नेते समील वळवईकर उपस्थित होते.

न्यायालयाने या प्रकल्पांना स्थगिती दिली असतानाही सरकार कामकाज सुरूच ठेवत असल्याचा आरोप करत, “सरकार न्यायालयाचाही अवमान करत आहे. दलदलीच्या जमिनीवर उभारले जाणारे हे दोन्ही प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आलेमाव यांनी केली. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे आणि लोकांवर जबरदस्तीने लादले जाणारे प्रकल्प सरकारने थांबवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन सुरूच राहिल्यास ४ जानेवारी रोजी गोव्याच्या जनतेचा मोठा जनसमुदाय येथे एकत्र येऊन आंदोलन तीव्र करेल, असा इशाराही युरी आलेमाव यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT