Court Order, summons  Canva
गोवा

Chimbel Unity Mall: प्रमाणपत्रे, परवान्यानंतरच ‘चिंबल युनिटी मॉल’चे काम सुरू! पर्यटन खात्याचे स्पष्टीकरण; विकासाला चालना मिळण्याचा दावा

Chimbel Unity Mall Update: चिंबल येथील युनिटी मॉल प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाच पर्यटन खात्याने तो प्रकल्प पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल येथील युनिटी मॉल प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाच पर्यटन खात्याने तो प्रकल्प पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित प्रधानमंत्री एकता मॉल (युनिटी मॉल) प्रकल्पाचे बांधकाम सर्व संबंधित विभागांकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) तसेच चिंबल ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना मिळाल्यानंतरच अधिकृतपणे सुरू केले आहे, असे पर्यटन खात्याने स्पष्ट केले आहे.

हा प्रकल्प सर्व कायदेशीर नियमांचे पालन करणारा असून तो ‘बफर झोन’च्या बाहेर आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिल्हा न्यायालयाने या बांधकाम परवान्याची नोंद घेतली असून प्रकल्पावर कोणताही स्थगिती आदेश नाही.

त्यामुळे ‘युनिटी मॉल’चे काम पुढे सुरू ठेवता येत आहे. या प्रकल्पामुळे चिंबल आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यामुळे स्थानिक लोकांचे जीवनमान सुधारेल, आर्थिक स्वावलंबन वाढेल आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल असे खात्याचे म्हणणे आहे.

रोजगाराबरोबरच हा प्रकल्प कौशल्य विकास आणि उद्योजकतेवरही भर देतो. केंद्र सरकारच्या “वन डिस्ट्रीक्ट, वन प्रॉडक्ट” या उपक्रमाचा हा भाग असून कारागीर आणि उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. यामुळे पर्यटन उपक्रमांना चालना मिळेल आणि स्थानिक प्रतिभेला आधुनिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यास मदत होईल, असे खात्याचे म्हणणे आहे.

युनिटी मॉल हा एक महत्त्वाचा उपक्रम असून तो स्थानिक समुदायाला शाश्वत आणि अर्थपूर्ण रोजगार देईल. तसेच कारागीर आणि उद्योजकांना सक्षम बनवून आर्थिक विकास, कौशल्यवृद्धी आणि सांस्कृतिक संवर्धन यांचा समतोल साधेल.
रोहन खंवटे, पर्यटनमंत्री
रोजगार निर्मिती बरोबरच युनिटी मॉल कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे केंद्र ठरेल. स्थानिक प्रतिभेला राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडून हा प्रकल्प चिंबल आणि परिसराच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक परिवर्तनास हातभार लावेल.
केदार नाईक, पर्यटन संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: "25 कोटी खर्च झालेत, आता माघार नाही!", युनिटी मॉल हलवण्यास सरकारचा नकार; मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर ग्रामस्थ काय उचलणार पाऊल?

Mandrem: सफर गोव्याची! शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देणारं 'मांद्रे'

Mandovi Express: प्रवास घाईचा नाही, तर 'चवीचा'! मुंबई-गोवादरम्यान धावणारी फूड क्वीन 'मांडवी एक्सप्रेस'; खवय्यांसाठी का आहे स्वर्ग?

Viral Video: महामार्गावरील 'त्या' हॉटेलबाहेर मृत्यूनं गाठलं, पण एका सेकंदानं उलटला डाव; व्हायरल व्हिडिओवर नेटकरी म्हणाले, 'यमराज' बहुदा सुट्टीवर होते!

Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

SCROLL FOR NEXT