Chimbel Unity Mall: वादग्रस्त युनिटी मॉल प्रकल्पाला धक्का! न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ‘ब्रेक’; चिंबलप्रकरणी उपसंचालकांचे आदेश स्थगित

Chimbel Project: न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे गोवा पर्यटन विकास महामंडळाला बांधकाम परवाना जारी करण्याची पंचायतीची प्रशासकीय प्रक्रिया थांबली आहे.
Court Order, summons
Court Order, summons Canva
Published on
Updated on

पणजी: गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या चिंबल येथील वादग्रस्त युनिटी मॉल प्रकल्पाला आणखी एक धक्का बसला आहे. उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने पंचायत उपसंचालकांच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे.

उपसंचालकांनी चिंबल पंचायतीला या प्रकल्पासाठी बांधकाम परवाना देण्याचे आदेश जारी केले होते. मात्र, आता न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे गोवा पर्यटन विकास महामंडळाला बांधकाम परवाना जारी करण्याची पंचायतीची प्रशासकीय प्रक्रिया थांबली आहे.

या प्रस्तावित मॉलचे ठिकाण पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या तलावाजवळ असल्यामुळे पर्यावरणाला आणि स्थानिक जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होणार असल्याचा दावा ग्रामसभेत लोकांनी केला होता. ग्रामपंचायतीने ग्रामसभेतील तीव्र विरोधामुळे केंद्र-पुरस्कृत १७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला बांधकाम परवाना देण्यास नकार दिला होता.

Court Order, summons
Chimbel: 'पणजीला पाण्याची गरज लागेल तेंव्हा चिंबलमधील तळे मदतीला येईल'! शिरोडकरांचा दावा; प्रकल्पांना विरोध कायम

त्यानंतर महामंडळाने गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करून परवानगी मागितली होती. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायतीला परवाना देण्याचे आदेश दिल्यानंतर पंचायतीने पंचायत उपसंचालकांकडे या आदेशाला आव्हान दिले होते. दरम्यान पंचायत उपसंचालकांनी देखील हा आदेश कायम ठेवला होता.

Court Order, summons
Chimbel Panch Video: चिंबल पंचांचा वादग्रस्त व्हिडीओ, धमकीप्रकरणी मनोज परबांकडून तक्रार दाखल; 6 जणांना प्रतिबंधात्मक अटक

१७ रोजी सुनावणी

सत्र न्यायालयाचा हा अंतरिम आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाला असून यासंदर्भातील पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. या स्थगितीमुळे चिंबल ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले आणि पंचायत उपसंचालकांनी नुकतेच कायम ठेवलेले निर्देश पाळण्याची सक्ती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com