Chimbel Unity Mall Dainik Gomatnak
गोवा

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल पाहिजेच कशाला'? Social Media वर रंगली चर्चा; चिंबलवासियांच्या लढ्यावरती नेटकरी झाले व्यक्त

Chimbel Unity Mall Viral Post: स्थानिक नागरिकांच्या मते, हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून तळ्याच्या आसपास मोठ्या व्यावसायिक प्रकल्पामुळे परिसंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.

Sameer Panditrao

चिंबल: चिंबल येथील तोयार तळे परिसरात प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध कायम आहे. “युनिटी मॉल नकोच” या भूमिकेवर चिंबलवासीय ठाम असून, प्रकल्प रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च झाल्याने तो दुसऱ्या ठिकाणी हलवता येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रकल्पावरून निर्माण झालेला वाद अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून तळ्याच्या आसपास मोठ्या व्यावसायिक प्रकल्पामुळे परिसंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच स्थानिक पायाभूत सुविधांवरही ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्ते प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका युजरने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘युनिटी मॉल’ हा स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ देण्याचा प्रयत्न असला तरी ती उत्पादने विद्यमान बाजारपेठांमध्येच का विकली जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे.

“लोक दररोज स्थानिक बाजारात खरेदीसाठी जातात. तिथेच स्थानिक उत्पादने उपलब्ध करून दिल्यास त्यांची मागणी अधिक वाढेल. एकाच ठिकाणी मोठा मॉल उभारून लोकांनी तिथेच यावे, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा विक्रीचे जाळे व्यापक करणे अधिक परिणामकारक ठरेल,” असे मत या पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत स्थानिक व्यापाऱ्यांचे सशक्तीकरण, लघुउद्योगांना पाठबळ आणि विकेंद्रित विक्री व्यवस्थेची गरज अधोरेखित केली आहे. तर काहींनी मॉलमुळे पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळू शकते, असे मत व्यक्त केले आहे. चिंबल ‘युनिटी मॉल’ प्रकल्पावरून स्थानिक नागरिक, सरकार आणि डिजिटल समुदाय यांच्यातील मतभेद अधिक तीव्र होत असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सागरी सफारी ठरली जीवघेणी! 350 हून अधिक प्रवाशांची फेरी समुद्रात बुडाली; 15 जणांचा मृत्यू, शेकडो जणांचे जीव वाचवण्यात यश VIDEO

Chimbel Unity Mall: आंदोलकांनी संयम ठेवावा, लवकरच मार्ग काढू! युनिटी मॉलप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; संयुक्त तपासणीनंतर फायनल निर्णय

Grah Gochar February 2026: फेब्रुवारीत ग्रहांची महायुती! 4 ग्रहांचे गोचर अन् 5 राजयोग; 'या' राशी होणार मालामाल

VIDEO: बुमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूवर पांड्या फिदा; जेमिसनला बोल्ड केल्यावर काय घडलं? सोशल मीडियावर हार्दिकचा हटके अंदाज व्हायरल!

शौर्याला सलाम!! गोव्याच्या दोन सुपुत्रांना सर्वोच्च 'परम विशिष्ट सेवा पदक'; 77व्या प्रजासत्ताक दिनी गोमंतकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

SCROLL FOR NEXT