Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल स्थानिकांसाठी महत्वपूर्ण'! खंवटेंचे प्रतिपादन; रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचा केला दावा

Rohan Khaunte: हा प्रकल्‍प रोजगार आणि स्‍थानिक कारागीर, उद्योजकांसाठी महत्त्‍वपूर्ण ठरणार असल्‍याचा दावा मंत्री खंवटे आणि पर्यटन संचालक नाईक यांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल येथील प्रस्‍तावित युनिटी मॉल प्रकल्‍पाला स्‍थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. परंतु, या प्रकल्‍पामुळे स्‍थानिकांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होण्‍यासह राज्‍यातील कारागीर आणि उद्योजकांसाठीही तो महत्त्‍वपूर्ण ठरणार असल्‍याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन संचालक केदार नाईक यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

राज्‍य सरकारने प्रस्‍तावित युनिटी मॉल चिंबलमध्‍ये उभारण्‍याचे निश्‍चित केल्‍यानंतर स्‍थानिकांनी या प्रकल्‍पाविरोधात लढा उभा केला आहे. या प्रकल्‍पाचा मोठा परिणाम चिंबलमधील तळे आणि स्‍थानिकांवर होणार असल्‍याचा दावा विरोधकांकडून करण्‍यात येत आहे.

प्रकल्‍पाविरोधात त्‍यांनी साखळी उपोषणही सुरू केले आहे. परंतु, हा प्रकल्‍प रोजगार आणि स्‍थानिक कारागीर, उद्योजकांसाठी महत्त्‍वपूर्ण ठरणार असल्‍याचा दावा मंत्री खंवटे आणि पर्यटन संचालक नाईक यांनी केला आहे. युनिटी मॉल प्रकल्‍प रोजगार निर्मितीसोबतच कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे केंद्र ठरणार आहे.

या प्रकल्‍पाच्‍या बांधकामासाठी आवश्‍‍यक ते सर्व परवाने पर्यटन खात्‍याने मिळवले आहेत. हा प्रकल्प सर्व कायदेशीर नियमांचे पालन करणारा असून तो बफर झोनच्या बाहेर आहे, असे नाईक यांनी म्‍हटले आहे. युनिटी मॉलच्‍या बांधकामाची जिल्हा न्यायालयाने नोंद घेतली असून, त्‍याला स्थगिती देण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे प्रकल्‍पाचे काम पुढे सुरुच ठेवण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

चिंबलमध्‍ये उभा राहत असलेला युनिटी मॉल हा प्रकल्‍प केंद्र सरकारच्‍या ‘एक जिल्‍हा, एक उत्‍पादन’ या उपक्रमाचा भाग आहे. या प्रकल्‍पामुळे कारागीर आणि उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी व्यासपीठ मिळणार आहे. यामुळे पर्यटन उपक्रमांना चालना मिळणार असून, स्‍थानिकांचे जीवनमान उंचावण्‍यासही मदत मिळणार असल्‍याचेही नाईक यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

31 डिसेंबरपूर्वी उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं; अन्यथा नवीन वर्षात बसू शकतो आर्थिक फटका

क्रिकेट विश्वावर शोककळा! अ‍ॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Goa ZP Elections: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी रिंगणात

APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी घडवला इतिहास; वाघशीर पाणबुडीतून केली सागरी सफर, पाहा Photo, Video

Gautam Gambhir: "आधी रणजी ट्रॉफीमध्ये मध्ये कोचिंग करा..." इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं गौतम गंभीरची उडवली खिल्ली!

SCROLL FOR NEXT