Chimbel Unity Mall Goa Dainik Gomatnak
गोवा

Chimbel: 'प्रकल्प उभारा, पण संवेदनशील चिंबलमध्ये नको'! मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार, शिरोडकरांचे स्पष्टीकरण

Chimbel Unity Mall Goa: मुख्यमंत्री सावंत यांनी चर्चेतून विषय सोडविण्यासाठी आवाहन केले असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे तोयार पाणथळ समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी सांगित

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: तोयार तळ्याशेजारी सरकारने उभारू घातलेल्या युनिटीमॉल प्रकल्पाला जो आम्ही विरोध करत आहोत तो विरोधकांच्या सांगण्यावरून नव्हे तर तो पर्यावरणाचा विचार करून होय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चर्चेतून विषय सोडविण्यासाठी आवाहन केले असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे तोयार पाणथळ समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिरोडकर म्हणाले, आम्ही कुणा विरोधकांना बळी पडलेलो नाही आमची आमच्या गावातील तळ्याबद्दल संवेदनशीलता आहे, आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्‍नांमुळे आम्ही विरोध करत आहोत. सरकारने राज्यातील इतर ठिकाणी हा प्रकल्प अवश्‍य उभारावा परंतु पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात तो आम्हाला नकोय, असे त्यांनी सांगितले.

गोव्यात पर्यावरणसंबंधी कार्य करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यास आपल्याला कळून चुकेल या तळ्यांचे पर्यावरणाच्या अनुषंगाने किती महत्त्व आहे. आम्हा आदिवासी समाजाला पर्यावरण रक्षण कोणी शिकवायची गरज नाही, आम्हाला जन्मापासून याचे बाळकडू मिळत असते,असेही शिरोडकर म्हणाले.

मुख्यमंत्री सांगतील तिथे चर्चा!

चिंबल गावात जे इंदिरानगर आले आहे त्याने आम्ही संकटात आलो आहोत आणि आता युनिटी मॉल म्हणजे आम्हाला सरकार दाबू पाहत आहे, हेच यावरून दिसून येत आहे. आम्ही आंदोलन करत आहोत तेथे सरपंच, आमदार आले नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन चर्चा करावी, असा हट्ट आम्ही धरणार नाही... ते सांगतील तेथे आम्ही चर्चा करू, असे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

SCROLL FOR NEXT