Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

Chimbel: पणजीहून फोंड्याकडे जाणाऱ्या कदंबाची सायकलस्वारास धडक; 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; 3 वर्षांनंतर चालकाची निर्दोष सुटका

Chimbel Kadamba Bus Accident: कदंबा महामंडळाची बस (क्रमांक जीए-०३-एक्स-०५५४) पणजीहून फोंड्याकडे जात असताना चिंबल-जंक्शन येथे ५९ वर्षीय सायकलस्वार देऊ म्हार्दोळकर यांना धडक बसली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल-जंक्शन येथे २०२२ मध्ये अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील कदंबा परिवहन महामंडळाचा बसचालक रूपेश मुडकुडकर याची मेरशी येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

आरोपीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम २७९ व ३०४-अ याखालील आरोप सिद्ध करण्यात अभियोक्त्याला अपयश आल्याचे न्यायाधीश अंकिता नागवेकर यांनी आपल्या सविस्तर निकालात नमूद केले.

२३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी कदंबा महामंडळाची बस (क्रमांक जीए-०३-एक्स-०५५४) पणजीहून फोंड्याकडे जात असताना चिंबल-जंक्शन येथे ५९ वर्षीय सायकलस्वार देऊ म्हार्दोळकर यांना धडक बसली होती. त्यात जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत दंडाधिकाऱ्यांनी नमूद केले की, गुन्हेगारी प्रकरणात दोन शक्यता असतील तर आरोपीच्या हिताची शक्यता ग्राह्य धरावी आणि अभियोक्त्याने दोष “सर्व वाजवी शंका दूर करून” सिद्ध करणे आवश्यक आहे.

न्यायालयाने म्हटले की, अपघात दुर्दैवी असला तरी आरोपीने बेफिकिरीने किंवा निष्काळजीपणे वाहन चालवले याचे ठोस पुरावे सादर झालेले नाहीत. त्यामुळे रूपेश यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT