Ganesh Idol Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idol: चिमुकल्याने घरच्या घरी बनवली 'गणेशमूर्ती'! विसर्जनानंतर मातीचाही उपयोग; विधायक गणेशोत्सव

Ganesh idol workshop: म्हापसा शहरात चित्रकार आणि शिल्पकार चैताली मोरजकर हिने काही दिवसांपूर्वी लहान मुलांसाठी गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती.

Sameer Panditrao

म्हापसा शहरात चित्रकार आणि शिल्पकार चैताली मोरजकर हिने काही दिवसांपूर्वी लहान मुलांसाठी गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक मुलांनी मातीपासून गणेश मूर्ती तयार करायचे धडे घेतले आणि गणेश मूर्ती तयारही केल्या. पण ते तितक्यापुरते मर्यादित नव्हते. या लहान मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती आनंदाने गणेश चतुर्थी निमित्ताने पूजेला लावल्या.‌

'देव भावाचा भुकेला' हे संतवचन सार्थ करणारी त्यांची ही कृती होती. आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीनी नदीच्या आणि समुद्राच्या किनाऱ्यांवर केलेले विद्रूप प्रदूषण आपण पाहतो आहोत अशावेळी आपल्या घरातील छोट्या सदस्यांनी स्वतः तयार केलेली मातीची मूर्ती पूजेला लावून जे समाधान त्या कुटुंबांनी मिळवले आहे ते अलौकिक असेच आहे. या छोट्या मूर्तिकारांची ओळख दै. गोमन्तक आपल्याला करून देणार आहे.‌ आजचा मूर्तिकार आहे अमोघ कुलकर्णी. 

अमोघ कुलकर्णी म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाच्या आठवी इयत्तेत शिकतो. गेल्या वर्षीही त्याने आपल्या आई-वडिलांच्या मागे लागून, त्यांच्याकडून माती मिळवून घेऊन स्वतःच गणपती बनवला होता. यंदा त्याने औपचारिकरित्या गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेला हजेरी लावली आणि गणपती तयार केला.

सुमारे ८-९ इंच उंची असलेल्या या गणेश मूर्तीला अमोघ याने स्वतःच रंगवले आणि सजवले आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अमोघच्या आई-वडिलांनी आनंदाने केली आहे. अकरा दिवसांच्या या गणेशाचे विसर्जन घरीच पाण्यात केले जाणार आहे. पाण्यात ही मूर्ती विरघळल्यानंतर तिची माती घरच्या परसूमधे असलेल्या केळीच्या मुळाशी जाणार आहे. 

गेल्या वर्षी या कुटुंबात जेव्हा गणपती पुजण्यासंबंधी चर्चा सुरू झाली तेव्हा गणेश मूर्तीचे विसर्जन कुठे आणि कसे करावे याबाबतीत त्यांच्या मनावर थोडेसे दडपण आले होते. अमोघच्या वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे विसर्जन ही जबाबदारीची बाब बनली होती.

गणेश मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी जे प्रदूषण तयार होते त्यांची छायाचित्रे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतात. अशावेळी मनाला जे क्लेश होतात ते असहनीय असतात.

छोटी का असेना गणेश मूर्ती स्वतःच तयार करावी, मनोभावे ती पुजावी आणि स्वतःच्या जागेतच तिचे विसर्जन करावे ही एक फार छान गोष्ट आहे हा विचार करून, अशाप्रकारे जर तू गणेश उत्सव साजरा करू पाहत असेल तरच आपण तुला गणेश मूर्ती तयार करण्याची परवानगी देते असे अमोघच्या आईने त्याला सांगितले व अमोघही त्यासाठी तयार झाला. अमोघची आई म्हणते 'आता हा घरचा गणेशोत्सव मला अत्यंत आवडणारी गोष्ट बनली आहे.‌'

अमोघने तयार केलेल्या या गणेश मूर्तीबद्दल अमोघच्या आई, वैदेही कुलकर्णी आनंदाने भरभरून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'आमच्या कुटुंबातील लहान मुलाने गणेश मूर्ती तयार करावी आणि ती पूजेला लावावी यात आम्हाला काहीही वावगे वाटले नाही. अमोघच्या आजीने मात्र विशिष्ट माती मिळाली तरच गणेश मूर्ती तयार कर हा सल्ला त्याला दिला होता.

ही माती अमोघला जेव्हा मिळाली तेव्हा त्याला अगदी अत्यानंद झाला होता. शाळा सुटून घरी आल्यानंतर तहानभूक विसरून तो मातीची मूर्ती घडवण्याच्या कामाला लागत असे.' 

कुलकर्णी यांचे कुटुंब मूळचे कोल्हापूरचे

पण गेली पंधरा वर्षे हे कुटुंब गोव्यात वास्तव्याला आहे. कोल्हापूर येथे त्यांच्या घरचा मूळ गणपती पूजला जात असतो मात्र अमोघच्या लहान भावाने गोव्यातील आपल्या घरीही गणपती पूजण्याचा आग्रह आपल्या आई-वडिलांकडे केला आणि आई-वडिलांनी तो मान्यही केला.‌

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT