Suchana Seth Dainik Gomantak
गोवा

Candolim Murder Case: चार वर्षीय मुलाचे खून प्रकरण; आई सूचनाला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर पणजीतील बाल न्यायालयाने सूचनाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Pramod Yadav

Candolim Murder Case: आपल्याच चार वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या सीईओ सूचना सेठला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या वेळी तिच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली होती, त्याचा कालावधी आज संपल्यानंतर पणजीतील बाल न्यायालयाने सूचनाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सूचना सेठला आठ जानेवारी रोजी अटक केल्यानंतर सुरुवातीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली.

सूचनाच्या वाढीव पोलीस कोठडीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर आज (दि.19) तिला पणजीतील बाल न्यायालयासमोर उभे केले असता 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

चार वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत असून, सूचनाने हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर दोन तासांतच मुलाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तब्बल 19 तास सूचना मुलाच्या मृतदेहासोबत खोलीत थांबली होती असे सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर आली आहे.

सूचना सेठवर आपल्याच चार वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप आहे. गोव्यातील सिकेरी येथे मुलाचा खून करुन त्याचा मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीतून पोबारा करण्याचा तिचा बेत होता. मात्र, कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे तिला अटक करण्यात आली.

06 ते 08 जानेवारी या काळात हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, या घटनेपूर्वी देखील सूचना गोव्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

पतीसोबत असलेल्या तणापूर्ण संबंध, घटस्फोटाची प्रक्रिया आणि मुलाचा ताबा या वादातून मुलाचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी! 'सीजेपी'चे 11 ऑक्टोबरला पणजीत आंदोलन, अभिजीत दीपके राहणार अनुपस्‍थित

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना दंड ठोठावणार; गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

SCROLL FOR NEXT