Goa Accident death  Dainik Gomantak
गोवा

Chikhli Accident: भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, कुत्रा जागीच ठार; चिखलीतील दुर्घटनेत कारचा चेंदामेंदा

Chikhli Accident Death: अपघातात कुत्रा जागीच ठार झाला तर रानी बिंद या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातात त्या कारचेही नुकसान झाले.

Sameer Panditrao

वास्को: चिखली येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रानी बिंद (३५) या महिलेचा रविवारी गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२३ मे रोजी रात्री पावणेआठच्या चिखली येथील एसएमआरसी इस्पितळाकडील अंतर्गत रस्त्याच्या बाजूने आपल्या कुत्र्याला घेऊन जाणाऱ्या रानी बिंद यांना उल्हास नाईक या कारचालकाने जोरदार धडक दिली होती.

या अपघातात कुत्रा जागीच ठार झाला तर रानी बिंद या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातात त्या कारचेही नुकसान झाले. वास्को पोलिसांनी पंचनामा करून कारचालकाविरोधात गुन्हा नोंद केला होता.

दरम्यान, या अपघातप्रकरणी चौकशी व पंचनामा करणारे हवालदार दामोदर मयेकर यांनी हे प्रकरण योग्यरीत्या हाताळले नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो व रानी बिंद यांच्या नातेवाइकांनी केला होता. त्यांनी दोन वेळा वास्को पोलिस स्थानकाला भेटी देऊन विचारणा केली होती. रानी बिंद यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुतिन्हो पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्याकडे संपर्क साधला असता चौकशी अधिकारी बदलल्याचे कदम यांनी सांगितल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.

अक्षता नाईकच्या प्रकृतीत सुधारणा

वेर्णा येथे शनिवारी (ता३१) कारने ठोकरल्याने जखमी झालेल्या अक्षता नाईक हिची प्रकृती सुधारत असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले. या अपघातात केपे येथील अनिषा बोरकर हीचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी वेर्णा पोलिसांनी आगशी येथील जोनाथन परेरा (१९) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT