Kulem Accident: कुळेत 3 वाहनांचा भीषण अपघात; एक दुचाकीस्वार ठार, दुसरा थोडक्यात बचावला

Goa Road Accident: ज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून रविवारी (दि. १ जून) सकाळच्या सुमारास कुळे वाकीकुयण-शिगाव रस्त्यावर तीन वाहनांचा भीषण अपघात घडला.
Kulem Accident
Kulem AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

कुळे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालीय. दरम्यान रविवारी (दि. १ जून) कुळे वाकीकुयण-शिगाव रस्त्यावर तीन वाहनांचा भीषण अपघात घडला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा दुचाकीस्वार सुदैवाने थोडक्यात बचावला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वाकीकुयण-शिगाव रस्त्यावर चारचाकी आणि 2 दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुसऱ्या दुचाकीवरील युवकाने प्रसंगावधान राखत आपल्या दुचाकीवरून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

Kulem Accident
Goa Fishing: मोटे मोटे मोळये मासे घरा हाडी! चढणीचे मासे, दीपकावणी; गोव्याच्या मान्सूनातली मत्स्यसंपदा

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून पंचनामा व अधिक तपास सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Kulem Accident
Goa Monsoon: आपत्ती व्यवस्थापनचा निधी वाढवा! पंचायत, पालिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; मान्सूनपूर्व तसेच इतर कामांसाठी फंड अपुरा

गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात अपघातांची मालिका सुरू असून रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक नियंत्रण, गतिमान वाहनांची भरधाव वेगाने होणारी वाहतूक यामुळे अशा घटना घडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com