Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बंगळुरू क्षेत्रीय कार्यालयाने काल (शुक्रवारी) आणि शनिवारी दोन दिवस कॅसिनो व इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १२ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे.

पणजी: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बंगळुरू क्षेत्रीय कार्यालयाने काल (शुक्रवारी) आणि शनिवारी दोन दिवस कॅसिनो व इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १२ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजी प्रकरणात कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याचे

आमदार के. सी. वीरेंद्र यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वीरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे.

ईडीने कर्नाटकातील गंगटोक, चित्रदुर्ग जिल्हा, बंगळुरू शहर, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोवा (पपीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपीज कॅसिनो प्राइड, ओशन ७ कॅसिनो, बिग डॅडी कॅसिनो या पाच कसिनोंचा समावेश आहे) यासह देशभरातील ३१ ठिकाणी शोध मोहीम राबवली. या कारवाईत संशयित आरोपी ‘किंग ५६७’, ‘राजा ५६७’ अशा नावाने ऑनलाइन सट्टेबाजी साइट चालवत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय, संशयिताचा भाऊ के. सी. थिप्पेस्वामी दुबईतून डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज, प्राइम नाईन टेक्नॉलॉजीज या तीन व्यवसाय संस्था चालवत आहे, ज्या के. सी. वीरेंद्रच्या कॉल सेंटर सेवा आणि गेमिंग व्यवसायाशी संबंधित आहेत.

दरम्यान, आज के. सी. वीरेंद्र यांना सिक्कीममधील गंगटोक येथून अटक करण्यात आली आहे, तर तेथील न्यायिक दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले असून त्यांना बंगळुरू येथील न्यायाधिकरण न्यायालयात हजर करण्यासाठी ईडीने ट्रान्झिट रिमांड मिळविला आहे.

कर्नाटकातील आमदार रडारवर

कर्नाटकात गेल्या आठ दिवसांत दोन काँग्रेस आमदारांवर ईडीची कारवाई झाली आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी ईडीने उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवारचे काँग्रेस आमदार सतीश कृष्ण सैल यांच्या घरावर छापे टाकले होते. सैल यांचे गोव्यातील कार्यालयही ईडीने तपासले होते. ईडीने केलेल्या कारवाईत सैल यांच्या घरातून १.४१ कोटी रुपये रोख, ६.७५ किलो सोने आणि बँक खात्यांमधील तब्बल १४.१३ कोटी रुपयांच्या ठेवी जप्त करण्यात आल्या होत्या. सैल यांच्यावर २०१० मध्ये बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणी आरोप आहेत. बेलेकेरी बंदरातून सुमारे १.२५ लाख मेट्रिक टन

लोहखनिज परदेशात पाठविल्याचे समोर आले असून त्याची किंमत जवळपास ८६.७८ कोटी रुपये असल्याचा निष्कर्ष आहे.

विविध ठिकाणी कारवाई

शोध प्रक्रियेदरम्यान सुमारे १२ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह (ज्यामध्ये अंदाजे १ कोटी परकीय चलन, ६ कोटी रुपयांचे सोने) सुमारे १० किलो चांदीच्या वस्तू आणि चार वाहने जप्त केली.

सात बँक खाती आणि २ बँक लॉकर देखील गोठवण्यात आले. शिवाय, के. सी. वीरेंद्र, के. सी. नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन. राज यांच्या घरातून मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली.

वीरेंद्र यांचा भाऊ के. सी. थिप्पेस्वामी आणि पृथ्वी एन. राज हा दुबईहून ऑनलाइन गेमिंगचे काम हाताळत असून वीरेंद्र हे त्यांच्या सहकाऱ्यांसह जमिनीवरील कॅसिनो भाड्याने घेण्यासाठी व्यावसायिक भेटीवर बागडोगरामार्गे गंगटोक येथे गेल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com