Republic Day: 73 व्या गणतंत्र दिनी मुरगाव नगरपालिकेचे ध्वज ध्वजारोहण करताना मुरगांव मुख्याधिकारी जयंत तारी, बाजूस लेखा अधिकारी रिया नाईक, नगरसेविका देविता आरोलकर, नारायण बोरकर व इतर. Dainik Gomantak
गोवा

भारताचा स्वाभिमान म्हणजे गणतंत्र दिवस: मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारी जयंत तारी

देशाच्या इतिहासात गणतंत्र Republic day दिवसाचा मोठा वाटा असून त्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याची माहिती मुख्याधिकारी तारी यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

वास्को: भारताचा स्वाभिमान म्हणजे गणतंत्र दिवस, संविधानाला महत्त्व देणारा लोकशाहीप्रधान भारत देश असल्याची प्रतिक्रिया मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दिली. देशाच्या इतिहासात गणतंत्र Republic day दिवसाचा मोठा वाटा असून त्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याची माहिती मुख्याधिकारी तारी यांनी दिली.

(Chief Officer of Margao Municipality Jayant Tari said Republic Day is Indias pride)

वास्को Vasco येथील मुरगाव नगरपालिकेतर्फे 75 व्या गणतंत्र दिनी प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी जयंत तारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत लेखा अधिकारी श्रीमती रिया नाईक, नगरसेविका सौ. देविता आरोलकर, नगरसेवक नारायण बोरकर, फ्रेड्रिक हेंन्रिक, सदाशिव हरमलकर, महेश कुडाळकर, सचिन मणेरकर, महेश साळगांवकर, म्युनिसिपल स्कूलचे शिक्षक वर्ग, पालिकेचे कामगार, माजी नगरसेविका तारा केरकर, रिमा सोनुर्लेकर व नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्याधिकारी तारी म्हणाले की मुरगाव नगरपालिकेतर्फे कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 टन सुका कचरा तर 25 टन ओला नवीन नवीन यंत्र बसवण्यात येणार आहे. तसेच पोरमाऑइल कचरावाहू वाहन ट्रक लवकर आणण्यात येईल अशी माहिती तरी यांनी दिली.

कचऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी वास्को वासीयांचा सहभाग पालिकेला मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मुरगाव नगरपालिकेला Mormugao Municipality येणारी थकबाकी लवकर देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती तारी यांनी केली. यावेळी नगरसेवक नारायण बोरकर याने भारत देशाच्या संविधाना विषयी थोडक्यात माहिती दिली. म्युनिसिपल स्कूलच्या शिक्षका तर्फे देशभक्तीपर गायन सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका साक्षी परब यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

SCROLL FOR NEXT