Excise scam Dainik Gomantak
गोवा

Goa Excise Scam: ‘त्या’ कारकुनाकडून करणार पैसे वसूल

कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी कडक कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Excise Scam दै. ‘गोमन्तक’ने वाचा फोडलेल्या अबकारी खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करून संपूर्ण पैसे वसूल केले जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पेडणे येथील अबकारी खात्याच्या कार्यालयातील कारकुनाने केलेल्या या घोटाळ्यासंबंधी अबकारी आयुक्तांशी चर्चा केली आहे.

संबंधित घोटाळेबाज कारकुनावर कडक कारवाई करून त्याच्याकडून सर्व पैसे वसूल केले जातील, असेही त्यांनी पुढे सांगितले.

मद्य विक्री परवान्याच्या नूतनीकरणातून 70 ते 80 व्यावसायिकांनी अबकारी खात्याला सुमारे दोन कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार दै. ‘गोमन्तक’ने तीन दिवसांपूर्वीच उघडकीस आणला होता.

या प्रकरणाच्या चौकशीनंतर आर्थिक फसवणूक केलेल्या कारकुनाचे नाव समोर येताच त्याच्याकडून या घोटाळ्याबाबतच्या फाइल, सर्व तपशील, दस्तऐवज खात्यात जमा करून घेतले आहेत.

कारकुनाकडून गुन्हा मान्य

पेडणे येथील अबकारी खात्याच्या कार्यालयातील या कारकुनाने शुक्रवारी आपली चूक मान्य करत या घोटाळ्यातील 11 लाख रुपये अबकारी खात्यात जमा केले.

त्याच्याकडून उर्वरित रक्कम वसूल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT