पणजी: गोवा मुक्तिदिनाच्या (Goa Liberation Day) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सेवा पदकांची घोषणा करण्यात आली. आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) मुक्तिदिन सोहळ्यामध्ये या पदकांचे केले.
पोलीस उपअधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, पोलिस निरीक्षक सगुण सावंत, महिला पोलिस निरीक्षक रेश्मा शिरोडकर, महिला पोलिस उपनिरीक्षक अंजली गावकर, साहाय्यक उपनिरीक्षक जयेश परब, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद देसाई, हवालदार सिद्धेश गावस यांना मुख्यमंत्री पोलिस सेवा पदकाने सन्मानित केले.
ईशा सावंत, विनायक वळवईकर या दोन नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अमर हेबळेकर, प्रसिद्ध नाईक, दीपक पेडणेकर, अरुण पंचवाडकर हे सहाजण उत्कृष्ट स्वयंपूर्ण मित्र ठरले असून या सर्वांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव होणार आहे.
नीलेश ऊर्फ विश्वास चोडणकर, देविदास सुर्लीकर, (पेन्ह दी फ्रान्स), गौरी गोविंद वेळीप, (शेळप, माटवे- काणकोण) यांना मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गृहरक्षक दीपश्री चोडणकर, आनंद पवार, ज्योस सी.ए.टी. परेरा, प्रमोद सराफ यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पदक देण्यात आले.
राज्य कृषी पुरस्कार
वासुदेव उर्फ वंदित नाईक यांना कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अनिथा मॅथ्यू वाल्लिकापेन यांना कृषी विभूषण, गौतम गोविंद कामत यांना कृषी भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. दिलीप नारूलकर यांना सेंद्रिय शेतीसाठीचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. जयंत राणे, नाहीद अहमद शेख, चंद्रहास देसाई यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.
अग्निशामक सेवा पदक पुरस्कार
स्टेशन फायर अधिकारी श्रीपाद गावस, लिडिंग फायर फायटर प्रमोद महाले आणि फायर फायटर सईद अमजद यांना मुख्यमंत्री अग्निशामक सेवा पदक जाहीर झाले आहे. मुक्तिदिन सोहळ्यामध्ये ही पदके त्यांना प्रदान करण्यात आले.
वाळवे यांना समाज कार्यकर्ता पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना समाज कार्यकर्ता पुरस्कार गोवा मुक्तिदिन सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
डिचोली पालिका उत्कृष्ट : डिचोली नगरपालिका उत्कृष्ट ठरली असून मुक्तिदिन सोहळ्यामध्ये नगराध्यक्ष कुंदन फळारी हे हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते स्वीकारणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.