CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत'ची गुढी उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प

साखळीत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांनी स्वस्थ राहण्याचा संकल्प केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’ ते आता ‘स्वस्थ भारत’ या मंत्रावर सर्वांनी कार्य करावे, असे सांगून नववर्षारंभी ‘स्वच्छ भारत’ बरोबरच ‘स्वस्थ भारत’चा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी सर्वांनी योगसाधना व प्राणायाम यांचा अवलंब दैनंदिन जीवनात करावा, असेही ते म्हणाले. साखळी येथे हिंदू नववर्ष स्वागताप्रीत्यर्थ आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

सर्वच बाबतीत सरकारवर जबाबदारी घालून चालणार नाही. कोणत्याही विधायक कार्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून व आपल्या घरापासून करावी. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

नव वर्ष स्वागत समिती साखळीतर्फे आयोजित नव वर्ष शोभयात्रा व ध्वजपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. साखळी बाजारात विधीवतपणे ध्वजपूजन व ध्वजारोहण झाले. त्यानंतर शहरात शोभयात्रा काढण्यात आली.

के. बी. हेडगेवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सादर करून या शोभयात्रेत उत्साह निर्माण केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, समितीच्या अध्यक्षा राधिका कामत सातोस्कर यांनी या शोभयात्रेत सहभाग घेतला.

शोभयात्रा साखळी शहरातून गोकुळवाडी येथील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थानात दाखल झाल्यानंतर घंटानाद झाला.

त्यानंतर आयोजित औपचारिक कार्यक्रमाला व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख वक्ते योगशिक्षक संदेश बाराजणकर, नगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, नव वर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा राधिका कामत सातोसकर, सचिव अभय बर्वे, उपाध्यक्ष सुशांत पाटील आदींची उपस्थिती होती.

संदेश बाराजणकर म्हणाले, भारतीय संस्कृती जपत असताना अभिमान बाळगायला हवा. आमच्या संस्कृतीबाबत गैरसमज आज पसरविले जात आहेत. त्यामुळे आमच्या लोकांनी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे.

येत्या काळात प्रत्येक मंदिराची एक गोशाळा असावी, तसेच गो आधारित शेती निर्माण व्हावी. सनातन हिंदू धर्माच्या रक्षण आणि संवर्धनाचा संकल्प आजच्या दिवशी करायला हवा.

साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ म्हणाले की, आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक असून त्यासाठी योग हे एक चांगले माध्यम आहे. आरोग्य चांगले राहिल्यास आम्ही संस्कृती व आपल्या समाजाच्या रक्षणासाठी झटू शकतो.

स्वागत अध्यक्षा राधिका कामत सातोसकर यांनी केले. सूत्रसंचालन नगरसेविका शुभदा सावईकर यांनी केले. तर अभय बर्वे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT