CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: स्मार्ट सिटीच्या कामांवर मुख्यमंत्र्यांची करडी नजर...

Panjim Smart City: महापौर मोन्‍सेरात : सल्लागार आणि कंत्राटदारच जबाबदार!

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: पणजीत सुरू असलेल्‍या स्मार्ट सिटीच्‍या कामांवर स्‍वत: आपण देखरेख ठेवेन असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला तसेच महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांना दिले आहे, असे महापौर रोहित मोन्‍सेरात यांनी सांगून या प्रकल्पाच्या कामांतील घोळासाठी त्‍यांनी प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदाराला जबाबदार धरले.

पणजी महानगरपालिका मंडळाच्‍या आज झालेल्‍या बैठकीत राजधानीत प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांचा निकृष्ट दर्जाचा मुद्दा प्रामुख्‍याने चर्चेला आला. या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदार आणि प्रकल्प सल्लागारावर महापौर मोन्सेरात यांनी ठपका ठेवला आहे. सुमारे २० मिनिटे ही बैठक चालली.

बैठकीनंतर महापौर मोन्सेरात यांनी बैठकीत चर्चा झालेल्या विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबद्दल इमॅजिन स्मार्ट सिटी कंपनीला कळविणार आहे. प्रकल्‍प सल्लागाराने 8 कोटी रुपये घेतले आहेत. त्‍यामुळे त्‍याने या कामांवर लक्ष ठेवणे गरजेचे

आहे. या कामांबाबत नुकतीच मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि महापौरांची बैठक झाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. मुख्यमंत्री कामांवर वैयक्तिकरित्या नजर ठेवणार आहेत, असे मोन्सेरात पुढे म्हणाले.

राजधानी पणजीतील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबद्दल इमॅजिन स्मार्ट सिटी कंपनीला कळविणार आहे. प्रकल्‍प सल्लागाराने ८ कोटी रुपये घेतले आहेत. त्‍यामुळे या कामांवर लक्ष ठेवणे त्‍याचे कर्तव्‍य आहे.
- रोहित मोन्सेरात, महापौर
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचे आर्थिक लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. या कामांत सुरक्षा उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेले प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदारांची फौजदारी चौकशी करणे गरजेचे आहे.
- उदय मडकईकर, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT