Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant:...तर याद राखा, मुजोर टॅक्सी चालकांना CM ची तंबी

पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Pramod Yadav

अमेरिकन पर्यटकांना (American tourist) टॅक्सीने प्रवास करण्यासाठी बस चालकांना धमावून पर्यटकांना अडविल्याची घटना नुकतीच घडली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून, मुजोर टॅक्सी चालकांना त्यांनी तंबी दिली आहे. तसेच, पोलिसांना याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत

मुरगाव येथे क्रुजने (Mormugao Port) आलेल्या अमेरिकन पर्यटकांना बसने प्रवास करण्यास टॅक्सी चालकांनी रोखल्याची घटना निषेधार्ह आहे. अशा प्रकारे कोणी करत असल्यास त्याविरोधात सक्त कारवाई केली जाईल. तसेच, टॅक्सी चालकांनी बस चालकांना धमकावल्यास तर टॅक्सी चालकांना अटक केली जाणार आहे. शिवाय घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

नेमकं घडलं काय?

मुरगाव येथे अमेरिकन पर्यटकांचे एक क्रुज दाखल झाले. या पर्यकांनी बसने जाण्याचा विचार केला. मात्र, टॅक्सी चालकांनी बस चालकांना धमकावले व पर्यटकांनी टॅक्सीनेच प्रवास करावा असा आग्रह धरला. टॅक्सी चालकांनी काही काळ अमेरिकन पर्यटकांना जबरदस्तीने थांबवून देखील ठेवल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची सरकराने गंभीर दखल घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT