CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत गायिका लॉर्नाची ‘पद्म’साठी शिफारस करणार

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: मुंडकारांना घराची मालकी आणि घराखालील जमीन देण्याचे निर्णय वेगाने घेतले जावेत, यासाठी सरकार प्रयत्न करेल. काही मुंडकारांची घरे बेकायदा ठरवून पाडली जातात तेव्हा आपल्यालाही वेदना होतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दूरदर्शनवरील ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात नमूद केले.

अनेकवर्षे राहत असलेले घर आता कोणी पाडू शकणार नाही, अशी निर्भयता गोमंतकीयांना सरकार निश्चितपणे देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. गोमंतकीय गानकोकिळा लॉर्ना यांच्या नावाची शिफारस पुढील वर्षी ‘पद्म’ पुरस्कारासाठी केली जाईल, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

ते म्हणाले, भूखंड विकसित करणाऱ्यानेच जलवाहिनी घातली पाहिजे. सरकारच्या मुख्य जलवाहिनीतून त्याने जोडणी घेतली पाहिजे. बहुतेकदा तसे होत नाही, त्यामुळे सरकारी पाणी वस्तीपर्यंत पोहचत नाही. बामणवाडा शिवोली येथे पाणी टंचाई का आहे, याची पाहणी सोमवारी संबंधित अधिकारी तेथे जाऊन करतील आणि समस्या दूर करतील.

दिव्यांगांसाठी गोमेकॉ आणि सरकारी इस्पितळांच्या बाह्य रुग्ण विभागांत आरक्षित जागा ठेवण्याची सूचना संबंधितांना करणार आहे. त्याहीपुढे बाह्य रुग्ण विभागातील नोंदणी ऑनलाईन करण्यावर भर राहिल. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीची वेळ मिळाल्याशिवाय कोणी तपासणीसाठी येऊ नये. यात आपत्कालीन तपासणीचा समावेश नाही.

जनमत कौलावेळी झटलेल्यांना स्वातंत्र्यसैनिक मानता येईल का, याविषयी गृह खात्याचे म्हणणे मागितले आहे, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. ते म्हणाले, रस्त्यांची कामे आता पाऊस ओसरल्याने करण्यास सुरवात केली जाईल. वाठादेव आणि निरंकाल येथील पथदीपांचा प्रश्नही सोडवला जाईल.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी पुढील वर्षापासून जेईई परीक्षा द्यावी लागणार असली तरी राज्यापुरती वेगळी गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यातूनच गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर महाविद्यालयांत प्रवेश दिला जाणार आहे.

पालिका, पंचायतीचा कर भरला नाही म्हणून हयातीचा दाखला अडवता येणार नाही,असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. अक्षता भट यांनी या कार्यक्रमांचे संचालन केले.

खासगी क्षेत्रातील अनुभव प्रमाणपत्रही ग्राह्य !: सरकारी नोकरीसाठी आता राज्य सरकारी कर्मचारी भरती आयोग अनुभव प्रमाणपत्र मागणार आहे. त्यासाठी विविध सरकारी खात्यात प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्याच्या प्रमाणपत्रासह खासगी क्षेत्रातील अनुभवाचे प्रमाणपत्रही ग्राह्य धरले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

क्रीडा विद्यापीठ यावे, यासाठी प्रयत्नशील!

राज्यात क्रीडा क्षेत्राचा विकास होत आहे. बीच व्हॉलिबॉल, जागतिक टेबल टेनिस स्पर्धा यंदा गोव्यात झाल्या. यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्याचे १०-१२ खेळाडूंचे पथक असे. यंदा या स्पर्धेतील ४० क्रीडा प्रकारांत गोमंतकीय खेळाडू सहभागी झाले आहेत. तिसेक पदके जिंकली आहेत.

यापुढे आशियायी स्पर्धा आहेत, त्यातही गोमंतकीय खेळाडू चमकतील. या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातही गोव्याचे नाव पुढे येईल. क्रीडा विद्यापीठ खासगी क्षेत्रातून येथे यावे, असा प्रयत्न आहे. त्याला सरकार पाठिंबा देईल. जलक्रीडा प्रकारांतील शिक्षण देणारी संस्थाही लवकरच सुरू होणार आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT