G20 Meet in Goa Dainik Gomantak
गोवा

G20 Meet in Goa: गोव्यातील G20 बैठकीच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; एकूण 8 बैठका होणार

भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंग गोव्यात

Akshay Nirmale

G20 Meet in Goa: गोव्यात येत्या काळात होणाऱ्या G 20 राष्ट्रांच्या बैठकीसाठीची तयारी आणि पायाभूत सुविधांचा आढावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला आणि केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंग हे आज या बैठकीचा आढावा घेण्यासाठी गोव्यात आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांची पर्वरी येथे भेट घेतली.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एप्रिल ते जुलै या कालावधीत गोव्यात G20 च्या आठ बैठक होणार आहेत. त्यापैकी दोन बैठका आरोग्य आणि पर्यटन मंत्रालयाशी संबंधित आहेत. पहिली बैठक 17 ते 19 एप्रिल या काळात होणार आहे तर मे महिन्यात दुसरी बैठक होणार आहे.

5 ते 23 जून या कालावधीत तीन गटांची बैठक असून जुलैमध्ये आणखी एक बैठक होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे हा या बैठकींचा केंद्रबिंदू असेल, स्थानिक उत्पादनांसाठी व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला यातून चालना मिळेल, राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोव्याच्या संकल्पनेलाही G20 बैठकीत पुढे नेण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

राज्यपालांनीही घेतली बैठक

दरम्यान, गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनीही आज, सोमवारी राजभवनात G20 च्या मुख्य संयोजकांसमवेत बैठक घेतली. हर्षवर्धन श्रृंगला, राज्यपालांचे सचिव संजीत रॉर्डिग्ज, सनदी अधिकारी एमआरएम राव आदी यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT