CM Pramod Sawant | Ankurkumar Prasad and His Family | Babush Monseratte Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी घेतली लहानग्या अंकुरकुमार प्रसादची भेट; 1 लाख रूपये देऊन केला गौरव

चौथीत शिकणाऱ्या अंकुरकुमारने नदीत बुडणाऱ्या तीन मुलांचा वाचवला होता जीव

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: कुंभारजुवे येथे नदीत बुडणाऱ्या तिघांना वाचवणाऱ्या अंकुरकुमार प्रसाद या चौथीत शिकणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थ्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज, शुक्रवारी भेट घेतली. यावेळी अंकुरकुमार याने दाखवलेल्या शौर्याबद्दल मुख्यमत्र्यांनी अंकुरकुमारला एक लाख रूपये देऊन त्याचा सन्मान केला.

मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या भेटीवेळी अंकुरकुमार याच्यासह त्याच्या सर्व कुटूंबाला मुख्यमंत्र्यांनी गौरविले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, या शूर मुलाला भेटणे हे माझ्यासाठी आनंदाचे होते. अंकुरकुमार संजय प्रसाद याने नदीत बुडणाऱ्या तीन मुलांचा जीव वाचवला. त्याला एक लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

गोव्याला अंकुरकुमारचा अभिमान आहे. त्याने दाखवलेली तत्परता आणि शौर्य खरेच कौतूकास्पद आहे. त्याच्या उज्वल भविष्याकरीता माझ्या शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT