Women Empowerment App Launched in Sanquelim: महिला सशक्तीकरणाची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी सर्वच क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कार्य करावे लागेल.
आपल्यातील सामर्थ्य आणि कार्यक्षमता यावर विश्वास ठेऊन महिलांनी प्रत्येक संधीचा लाभ घ्यावा.
उपलब्ध साधनांच्या मदतीने महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, या हेतूने नारी शक्ती ॲप तयार करण्यात आला आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
रवींद्र भवन साखळी येथे आयोजित स्वयंपूर्ण नारी शक्तीचा गौरव या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्य स्वयंसहाय्य गट महासंघाच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगरसेविका रश्मी देसाई, शुभदा सावईकर आदींची उपस्थिती होती.
‘नारी शक्ती’मध्ये आपले जीवन तसेच इतरांचे जीवन समृद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. त्यासाठी हा उपक्रम महिलांना एकत्रित आणून त्यांच्या उपजत प्रतिभेला चालना देणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.