CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'राज्यात धार्मिक तेढ निर्माण करु नका...', जुलूस वाद प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आवाहन!

Goa News: राज्यात विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करू नका. जुलूस काढण्यावरून निर्माण झालेला वाद वाढवून काहीही साध्य होणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करू नका. जुलूस काढण्यावरून निर्माण झालेला वाद वाढवून काहीही साध्य होणार नाही. तसेच दोन्ही गटांमधील लोकांनी पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ करणे टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

जुने गोवे येथे गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. सावंत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. या कार्यक्रमाला कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, कुंभारजुवेचे जिल्हा पंचायत सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी यांनी आयुष्यभर स्वच्छतेवर भर दिला. बापू स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करायचे. पंतप्रधान मोदी यांनीही स्वच्छतेवर भर दिला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रम देशभरात सुरू झाला, तर गोव्यात ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाद्वारे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचता येईल, डॉ. सावंत म्हणाले. भारत देश महासत्ता बनावा, हे प्रत्येकाचे स्वप्न असून त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय ठेवले आहे. यात प्रत्येकाने योगदान देऊन हातभार लावावा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यात व्होकल फॉर लोकल, मेक इन इंडिया यासारखे उपक्रमांना चालना देण्याचे काम सुरू आहे. बाजारपेठेत स्थानिक साहित्य यावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे सरकारी महसूलही वाढणार आहे. स्वयंसेवक, महिला संघटना, युवकांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ, नवीन दर तपासा

Cricketer Death: 4 ओव्हर्स टाकल्या अन्... LIVE मॅच दरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा!

Horoscope: सोमवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; महादेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक काम होणार फत्ते, पैशांची चणचण मिटणार

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

SCROLL FOR NEXT