Honda Panchayat Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, होंड्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवले

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी नोव्हेंबर लागण्यापूर्वी राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येईल अशी हमी दिली होती.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा पंचायत (Honda Panchayat) क्षेत्रातील रस्त्यांची फार दुरवस्था झाली होती, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता, त्यामुळे वाहन चालकांना अपघातास सामोरे जावे लागत होते, सदर रस्त्या सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांनी वारंवार मागणी ही केली होती. याची दखल सरकारने घेऊन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी नोव्हेंबर लागण्यापूर्वी राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येईल अशी हमी दिली होती, त्यानुसार वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या वतीने त्वरित हालचाली सुरू करून होंडा परीसरातून जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवून सुरळीत केला आहे. यामुळे होंडा परीसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपला शब्द पाळला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सदर भागातील रस्त्यांची बऱ्याच ठिकाणी एकदम चाळण झाली होती, त्यामुळे नागरिकांना वाहतूक करताना समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे वारंवार वाहने नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ झाली होती, त्याच प्रमाणे खड्याचा अंदाज येत नसल्याने काही वेळा अपघाताला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे विविध पातळीवरून सरकारवर आरोप होत होते, याची दखल सरकारने घेऊन पावसाने उसंत घेतल्या नंतर तातडीने हालचाली करून रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्या वाहतूकीला सुरळीत बनवला आहे.

यावेळी काही ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण केले आहे तर काही ठिकाणी खडी डाबंर मिस्रण करून खडे्ड बुजवून तात्पुरती व्यवस्था केली आहे, मात्र या भागातील रस्त्यांचे पुढच्या पावसाळ्यापूर्वी संपूर्ण डांबरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे, नाही तर पुन्हा एकदा पावसाळ्यात रस्ता खड्डेमय बनण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे या भागातील अतंर्गत रस्त्यांच हॉटमिक्स डांबरीकरण गेल्या काही वर्षांपासून रखडलेले असल्याने रस्ता असुरक्षित बनला आहे, त्यांचेही डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

Goa Crime: गूढ उकलले! कुंकळ्ळीच्या बेपत्ता मुली नाशिकमध्ये सापडल्या; नेमकं काय घडलं वाचा

SCROLL FOR NEXT