Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 7 पोलिस अधिकाऱ्यांना मुख्‍यमंत्री सुवर्ण पदके

Goa Police: गोवा मुक्तिदिन सोहळ्यात करणार सन्मानित

दैनिक गोमन्तक

Goa Police: राज्‍य सरकारकडून मुख्‍यमंत्री सुवर्ण पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्‍यात उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्यासह सात पोलिसांना उत्कृष्ट कामगिरीसाठी निवडण्‍यात आले आहे. गोवा मुक्‍तिदिनी, 19 डिसेंबरला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ही पदके प्रदान करण्यात येतील.

अग्निशमन दलाच्या तीन अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक आणि होमगार्ड ज्ञानेश्वर तुळस्कर आणि सिंथिया रॉड्रिग्स यांना मुख्यमंत्री गृहरक्षक पदक देऊन गौरविण्‍यात येईल. पदके जाहीर केलेल्‍या पोलिस अधिकाऱ्यांमध्‍ये उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, मडगाव कोकण रेल्वेचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, केपे उपविभागीय पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे,

कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक, जुने गोवेचे साहाय्यक निरीक्षक नीळकंठ एकावडे, कोलवा वाहतूक विभागाचे साहाय्यक निरीक्षक जितेंद्र फळदेसाई, पणजीचे हवालदार नितीन गावकर, तसेच अग्‍निशमन उपअधिकारी शिवराम नाईक, लिडिंग फायर फायटर विष्णू गावस, फायर फायटर नितेश पागी यांना मुख्यमंत्री अग्निसेवा पदके देण्‍यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT